7 षटकार, 8 चौकार…. वानखेडेवर सॅमसनचा हिट ‘शो’! भारतीय प्रेक्षकांना गप्प करू म्हणाऱ्या इंग्रजा

संजू सॅमसन IND विरुद्ध ENG T20 विश्वचषक उपांत्य फेरी : मुंबईतील ऐतिहासिक वानखेडे मैदानावर सुरू असलेल्या भारत विरुद्ध इंग्लंड टी-20 वर्ल्ड कप सेमीफायनल सामन्यात भारतीय संघाची सुरुवात धक्कादायक झाली. सलामीवीर अभिषेक शर्मा स्वस्तात माघारी परतल्याने भारतावर सुरुवातीलाच दबाव निर्माण झाला. मात्र या संकटाच्या क्षणी संजू सॅमसनने जबरदस्त खेळी करत संपूर्ण सामन्याचे चित्रच बदलून टाकले.

7 षटकार, 8 चौकार… वानखेडेवर सॅमसनचा हिट ‘शो’!

अभिषेक शर्मा लवकर बाद झाल्यानंतर संजू सॅमसनने सुरुवातीपासूनच आक्रमक फलंदाजी करत इंग्लंडच्या गोलंदाजांवर तुटून पडला. त्याने केवळ 26 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि त्यानंतरही त्याची फटकेबाजी थांबली नाही. शानदार टाइमिंग आणि तुफानी फटक्यांच्या जोरावर सॅमसनने तांडव घातला. सॅमसन 42 चेंडूत 8 चौकार आणि 7 षटकारांसह 89 धावा काढून बाद झाला. इंग्लंडला तिसरा ब्रेकथ्रू विल जॅक्सने दिला, ज्याने संजू सॅमसनला फिल साल्टकडे झेलबाद केले.

याआधी सुपर-8 फेरीत वेस्ट इंडिजला धूतले

सॅमसनची ही स्फोटक खेळी भारतीय संघासाठी अत्यंत महत्त्वाची ठरली. यापूर्वीही त्याने सुपर-8 फेरीत वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 97 धावांची खेळी करत भारताला उपांत्य फेरीत पोहोचवण्यात मोलाची भूमिका बजावली होती. त्या खेळीनंतर आता सेमीफायनलमध्येही त्याने आपली जबरदस्त फॉर्म कायम ठेवत इंग्लंडच्या गोलंदाजांची अक्षरशः धुलाई केली.

हॅरी ब्रूकच्या चेहऱ्याचा रंग उडाला

या सामन्यापूर्वी इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू सॅम करणने भारतीय प्रेक्षकांना शांत बसवू, असे विधान केले होते. मात्र संजू सॅमसनच्या तुफानी फटकेबाजीसमोर इंग्लंडचे सर्व डावपेच फोल ठरले. त्याच्या चौकार-षटकारांच्या आतषबाजीत हॅरी ब्रूकसह इंग्लंडच्या खेळाडूंच्या चेहऱ्याचा रंगच उडाला.

अभिषेक शर्मा स्वस्तात बाद

आक्रमक सलामीवीर अभिषेक शर्मा मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात बाद झाला आणि भारताला सुरुवातीलाच विकेट गमवावी लागली. इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू विल जॅक्स याने टाकलेल्या चेंडूवर अभिषेकने आक्रमक फटका मारण्याचा प्रयत्न केला. मात्र चेंडू नीट टाइम न झाल्याने तो थेट फिल सॉल्टच्या हातात गेला. सॉल्टने झेल टिपताच इंग्लंडच्या खेळाडूंनी जोरदार जल्लोष केला. अभिषेक शर्माने आपल्या छोट्या खेळीत 7 चेंडूत 9 धावा केल्या. या डावात त्याने 2 चौकार लगावले, मात्र मोठी खेळी उभी करण्यात तो अपयशी ठरला.

हे ही वाचा –

Abhishek Sharma IND vs ENG Semi Final : संजूचा लाख मोलाचा सल्ला धुडकावला, अभिषेक शर्मानं इंग्रजांना हवं तेच केलं, वानखेडेवर नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.