‘मी नव्हे तर बुमराहच POTM पुरस्कारास पात्र, तो नसता तर मी…’; संजू सॅमसन नेमकं काय म्हणाला?

मुंबई : भारतानं इंग्लंडला 7 धावांनी पराभूत करत टी 20 वर्ल्ड कपच्या अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. संजू सॅमसनची दमदार फलंदाजी, जसप्रीत बुमराहची गोलंदाजी आणि अक्षर पटेलच्या अफलातून क्षेत्ररक्षणामुळं भारतानं अंतिम सामन्यात प्रवेश केला आहे. तर येत्या रविवारी अहमदाबाद येथे होणाऱ्या टी-20 विश्वचषक 2026 च्या अंतिम सामन्यात भारताचा सामना आता न्यूझीलंडशी होईल. तर दुसरीकडेटीम इंडियाचा सलामीवीर आणि विकेटकीपर संजू सॅमसन यानं सलग दुसऱ्या सामन्यात दमदार फलंदाजी केली. संजू सॅमसन यानं इंग्लंड विरुद्द 42 बॉलमध्ये 89  धावा केल्या. संजूनं कालावधीच्या डावात 7 षटकार आणि 8 चौकार मारले. संजूनं कालावधीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर टीम इंडियाचा माजी कॅप्टन रोहित शर्माचा विक्रम मोडला. एका टी 20 वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक षटकार मारण्याचा विक्रम संजू सॅमसनच्या नावावर नोंदवला गेला आहे. असं असताना टी-20 विश्वचषक उपांत्य फेरीत भारताच्या शानदार विजयानंतर संजू सॅमसनने (Sanju Samson) जसप्रीत बुमराहची (Jasprit Bumrah) तोंडभरून प्रशंसा केली आहे. बुमराह एक परिपूर्ण पिढीतील प्रतिभा असलेला खेडाळु असल्याचे त्याने म्हटलेहे. त्याने आपला सामनावीर पुरस्कारही (Player Of The Match Awards) या स्टार वेगवान गोलंदाजाला समर्पित केलाहे. (जस्प्रीत बुमराहवर संजू सॅमसन)

Sanju Samson : सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला जाते, तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज

इंग्लंडविरुद्धच्या टी-20 विश्वचषक उपांत्य सामन्यात 42 चेंडूत 89 धावा काढल्याबद्दल सामनावीर म्हणून निवडण्यात आलेल्या संजू सॅमसनने गुरुवारी सांगितले की, विजयाचे सर्वाधिक श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. या उच्च धावसंख्येच्या सामन्यात बुमराहने चार षटकांत 33 धावा देत एक बळी घेतला. त्याने 18 व्या षटकात फक्त सहा धावा देऊन इंग्लिश फलंदाजांवर दबाव आणला. सात बाद 253 धावा काढल्यानंतर भारताने इंग्लंडला सात बाद 246 धावांवर रोखले. आपल्या डावात आठ चौकार आणि सात षटकार मारणारा सॅमसन म्हणाला, “आज संघाच्या कामगिरीवर आम्ही खूप आनंदी आहोत आणि त्याचे सर्व श्रेय जसप्रीत बुमराहला जाते. मला वाटते की तो एक जागतिक दर्जाचा गोलंदाज आहे. आजच्या पिढीत एकदाच येणारा गोलंदाज आहे आणि त्याने आज ते दाखवून दिले.” खरंतर, हा (प्लेअर ऑफ द मॅच) पुरस्कार त्यालाच द्यायला हवा.” असंही संजू सॅमसन म्हणाला.

पुरस्कार समारंभात सॅमसन म्हणाला, “जर आपण शेवटच्या षटकांमध्ये अशी गोलंदाजी केली नसती, तर कदाचित मी येथे उभा नसतो. त्यामुळे सर्व श्रेय गोलंदाजांना जाते, ज्यांनी स्वतःवर विश्वास ठेवला आणि कठीण परिस्थितीतही उत्कृष्ट कामगिरी केली.” त्याच्या खेळीबद्दल विचारले असता तो म्हणाला, “मला खूप छान वाटते. गेल्या सामन्यापासून माझी लय परत येत असल्याचे मला वाटले. मी स्वतःला थोडा जास्त वेळ दिला आणि त्याचे फळ मिळाले. मी आधी म्हटल्याप्रमाणे, तुम्हाला परिस्थितीचे मूल्यांकन करावे लागेल. आम्ही वानखेडेवर खूप क्रिकेट खेळलो आहोत आणि येथे लक्ष्याचा पाठलाग करणे थोडे सोपे आहे.”

Sanju Samson : “शतकांबद्दल सांगायचे तर, मला वाटते की….”

पुढे बोलताना संजू सॅमसन म्हणाला की, इशान किशनसोबत फलंदाजी करताना त्याला वाटले की या खेळपट्टीवर 250 धावांचा स्कोअर शक्य आहे. तो म्हणाला, “अभिषेक बाद झाल्यानंतर आम्ही ज्या पद्धतीने फलंदाजी केली, विशेषतः माझ्या आणि इशानमधील भागीदारी, त्यामुळे आम्हाला वाटले की येथे 250 धावांचा स्कोअर शक्य आहे.” आम्ही ड्रेसिंग रूममध्येही याबद्दल बोलत होतो.” मागील सामन्यात वेस्ट इंडिजविरुद्ध नाबाद 97 धावा काढणारा हा फलंदाज शतक हुकल्याबद्दल म्हणाला, “शतकांबद्दल सांगायचे तर, मला वाटते की ते नियोजनाने बनवले जात नाहीत, ते खेळाच्या परिणामी स्वाभाविकपणे येतात. हे कसोटी किंवा एकदिवसीय सामन्यांसारखे नाही जिथे तुम्ही वेग समायोजित करू शकता. जेव्हा तुम्ही प्रथम फलंदाजी करत असता तेव्हा तुम्हाला सातत्याने आक्रमकपणे खेळावे लागते. जर तुम्ही शेवटी योग्य स्थितीत आलात तर तुम्हाला कधीच माहित नसते की तुम्ही किती धावा काढू शकाल.” असेही तर म्हणाला.

आणखी वाचा

Comments are closed.