बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली; धोनीने लगेच खाली बसवले, रोहितही खळखळून हसला
साक्षी एमएस धोनी व्हिडिओ इंड विरुद्ध इंजी सेमीफायनल T20 वर्ल्ड कप 2026: टी-20 विश्वचषक 2026 च्या स्पर्धेत काल भारत आणि इंग्लंड (Ind vs Eng) यांच्यात सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर खेळवण्यात आला. या रोमांचक सामन्यात भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव केला. या सामन्यासाठी भारताचा सलामीवीर संजू सॅमसनला (Sanju Samson) सामनावीरचा पुरस्कार देण्यात आला.
भारतानं दिलेल्या 254 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडच्या फलंदाजांनी कडवी झुंज दिली. खासकरून मधल्या फळीतील जेकब बेथेलनं शतक झळकावलं. मात्र तरीही इंग्लंडचे प्रयत्न सात धावांनी अपुरे पडले. भारताकडून जसप्रीत बुमरानं प्रभावी मारा करताना 4 षटकात 33 धावा देत एक विकेट घेतली. तर हार्दिक पंड्यानंही 38 धावात दोन विकेट्स घेत भारताच्या विजयात मोलाचं योगदान दिलं. या विजयासह भारतानं चौथ्यांदा स्पर्धेच्या फायनलमध्ये धडक मारली आहे.
चौथा #T20WorldCup मुंबईत इंग्लंड विरुद्ध निरपेक्ष धावसंख्येतील विजयानंतर भारतासाठी अंतिम सामना 💪
थरारक कृतीबद्दल अधिक वाचा 👉 https://t.co/WPnrajAt2G pic.twitter.com/lPbOgKfWW4
— ICC (@ICC) 5 मार्च 2026
एमएस धोनी पत्नीसह वानखेडेवर- (MS Dhoni Rohit Sharma Wankhede Mumbai)
भारत आणि इंग्लंडचा सामना पाहण्यासाठी वानखेडेवर आजी-माजी दिग्गज क्रिकेटपटूंपासून बॉलिवूड कलाकारही उपस्थित होते. इंग्लंड लक्ष्याचा पाठलाग करत असताना सामन्यात अनेकदा भारतीयांच्या हृदयाचे ठोके चुकवणारे क्षण आले. विशेष म्हणजे भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni Mumbai) आणि त्याची पत्नी साक्षी धोनीही वानखेडेवर उपस्थित होती. सध्या एमएस धोनी आणि साक्षीचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आहे. (Sakshi MS Dhoni Video Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026:)
बुमराहकडून एक टप्पा कॅच, साक्षी आनंदाने नाचू लागली, नेमकं काय घडलं? (Sakshi MS Dhoni Video Ind vs Eng Semifinal)
इंग्लंड फलंदाजी करत असताना 18 व्या षटकांत भारतीय संघाचा जसप्रीत बुमराह गोलंदाजी करण्यासाठी आला. यावेळी इंग्लंडचा सॅम करनने एक फटका मारला आणि एक टप्पा पडून चेंडू थेट बुमराहच्या हातात गेला. मात्र मैदानात असलेल्या साक्षी धोनीला बुमराहने सॅम करनचा कॅच पकडल्याचे वाटले. यामुळे साक्षी आनंदाने जोरजोरात उडी मारुन नाचू लागली. याक्षणी कॅमेराही तिच्याकडेच होता. परंतु धोनीने लगेच तिला शांत करुन आऊट नाहीय, बॉल एक टप्पा गेला, असं सांगून खाली बसायला सांगितले. साक्षीला यावेळी काही कळेना…यावेळी बाजूला भारताचा खेळाडू रोहित शर्माही उपस्थित होता. हा क्षण पाहून रोहित शर्माही खळखळून हसताना दिसला.
सामन्यातील सर्वात मजेदार क्षण जेव्हा साक्षी भाईने बंप कॅच साजरा करण्यास सुरुवात केली pic.twitter.com/Do0SK2WWYo
– सुनील द क्रिकेटर (@1sInto2s) 5 मार्च 2026
भारत आणि इंग्लंडचा सामना कसा राहिला? (Ind vs Eng Semifinal T20 World Cup 2026)
नाणेफेक जिंकत इंग्लंडने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून संजू सॅमसन, शिवम दुबे, इशान किशन, तिलक वर्मा आणि हार्दिक पांड्या यांच्या दमदार खेळीच्या जोरावर भारतानं 7 बाद 253 धावा केल्या होत्या. संजू सॅमसनला इंग्लंडचा कर्णधार हॅरी ब्रुक यानं 15 धावांवर असताना जीवदान दिलं होतं. संजू सॅमसन यानं 89, इशान किशन यानं 18 चेंडूत 39 धावा केल्या. संजू सॅमसन आणि इशान किशन यांनी दुसऱ्या विकेटसाठी 97 धावांची भागिदारी केली. शिवम दुबेनं 25 बॉलमध्ये 45, हार्दिक पांड्यानं 12 चेंडूत 27 धावा केल्या. तिलक वर्मानं 7 चेंडूमध्ये 21 धावा केल्या. भारतानं आजच्या डावात 19 षटकार मारले. इंग्लंडच्या संघानं 20 षटकात 7 बाद 246 धावा केल्या आणि भारतानं 7 धावांनी विजय मिळवत अंतिम फेरीत प्रवेश केला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.