भारताकडे फक्त 30 दिवसांचा LPG गॅस उरला, CNG अन् घरगुती सिलेंडरच्या किंमती वाढणार?

इराण विरुद्ध इस्रायल अमेरिका युद्ध भारतात गॅस टंचाई: इस्रायल-इराण संघर्षाची झळ आता भारतालाही बसू लागली आहे. इराणच्या नाकेबंदीमुळे भारताला होणारा एलपीजी पुरवठा विस्कळीत झाला आहे. त्यामुळे घरगुती गॅस सिलिंडरचा (LPG Gas) तीव्र तुटवडा निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून केंद्र सरकारने तातडीने सर्व रिफायनरींना, एलपीजीचं उत्पादन (LPG Gas Production) वाढवण्याचे आदेश दिले आहेत. आता रिफायनरी कंपन्या त्यांच्याकडील प्रोपेन आणि ब्युटेनचा वापर फक्त स्वयंपाकाचा गॅस बनवण्यासाठी करतील. भारत 90% हून अधिक एलपीजी मध्यपूर्वेतून आयात करतो. मात्र, होर्मुझच्या सामुद्रधुनीत इराणने केलेल्या नाकाबंदीमुळे, एलपीजीची वाहतूक करणारे टँकर अडकले आहेत. त्याचाच परिणाम देशातील एलपीजी पुरवठ्यावर होताना दिसत आहे. सरकारकडे सध्या साधारण 30 दिवसांचा एलपीजी साठा उपलब्ध आहे. इराण-इस्रायल संघर्ष सुरु राहिल्यास नागरिकांचे हाल होऊ नयेत यासाठी भारत सरकार पर्यायी पुरवठादारांचा शोध घेत आहे. आणखी काही दिवस हे युद्ध असंच सुरू राहिल्यास, घरगुती गॅस मिळण्यास विलंब होण्याची शक्यता असून त्यामुळे सर्वसामान्यांचे हाल होऊ शकतात. (Iran Vs America War)

Iran America War: गॅसचा तुटवडा, कशावर परिणाम?

खाट उद्योग

सीएनजी आणि घरगुती पीएनजी

वीज उत्पादन

रिफायनरी आणि पेट्रोकेमिकल उद्योग

हॉटेल आणि रेस्टॉरंट उद्योग

सिरॅमिक आणि काच उद्योग

Gas shortage in India: गॅस तुटवड्यामुळे नेमकं काय होणार?

1. खाट उद्योग

भारतामध्ये नैसर्गिक गॅसचा सर्वात मोठा वापर युरिया खत निर्मितीसाठी होतो. देशात दररोज सुमारे 58 mmscmd गॅस खत उद्योग वापरतो. गॅसची उपलब्धता कमी झाल्याने काही युरिया प्लांट्सने उत्पादन 7-8% कमी केले आहे.

2. CNG आणि घरगुती PNG

City Gas Distribution सेक्टरमध्ये सुमारे 37 mmscmd गॅस वापरली जाते. यात CNG वाहने, घरगुती PNG यांचा समावेश होतो. दिल्लीमध्ये हे काम Indraprastha Gas Limited करते. मुंबईमध्ये Mahanagar Gas Limited सीएनजी गॅस पुरवठा करते. गॅस महाग झाल्यास CNG आणि PNG दर वाढू शकतात.

3. वीज उत्पादन

गॅस आधारित वीज प्रकल्प दररोज सुमारे 25.2 mmscmd गॅस वापरतात. गॅस कमी झाल्यास या प्रकल्पांच्या उत्पादनावर परिणाम होऊ शकतो.

आणखी वाचा

अमेरिका-इराण युद्धाचा पहिला झटका, पुण्यात व्यावसायिक वापरासाठीचा गॅस पुरवठा बंद, सरकारकडून डिलर्सना आदेश

ज्याची भीती होती, तेच झालं…इराण आणि अमेरिका-इस्त्रायल युद्धाच्या झळा महाराष्ट्रापर्यंत पोहोचल्या, सरकारकडून महत्वाचे आदेश

आणखी वाचा

Comments are closed.