भारत-न्यूझीलंड फायनल सामन्यासाठी लाल की काळ्या मातीचा पिच? नरेंद्र मोदी स्टेडियमच्या खेळपट्टीबा

भारत विरुद्ध Nz अंतिम T20 विश्वचषक 2026 खेळपट्टी अहवाल : अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियम (Narendra Modi Stadium) येथे 8 मार्च रोजी आयसीसी टी-20 विश्वचषक 2026 चा अंतिम सामना टीम इंडिया आणि न्यूझीलंड (India vs New Zealand Final T20 World Cup 2026) यांच्यात रंगणार आहे. या महत्त्वाच्या लढतीसाठी दोन्ही संघांचे खेळाडू आधीच अहमदाबादला पोहोचले आहेत. उपांत्य फेरीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेला पराभूत करत अंतिम फेरीत प्रवेश मिळवला, तर भारताने इंग्लंडवर 7 धावांनी रोमांचक विजय मिळवत सलग दुसऱ्यांदा फायनलमध्ये धडक मारली. त्यामुळे आता सर्वांचे लक्ष अंतिम सामन्याच्या पिचकडे लागले आहे. विशेष म्हणजे या विश्वचषकात अहमदाबादमध्ये दोन्ही संघांना पराभवाचा सामना करावा लागला आहे.

फलंदाजांसाठी अनुकूल पिचची शक्यता (Narendra Modi Stadium Pitch Report)

अंतिम सामन्यासाठी वापरली जाणारी पिच फलंदाजांसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता असल्याचे अहवालात म्हटले आहे. मुंबईप्रमाणेच येथेही धावांचा पाऊस पडू शकतो. फायनलसाठी सेंटर पिचचा वापर केला जाणार असून ती लाल आणि काळ्या मातीच्या मिश्रणातून तयार करण्यात आली आहे. त्यामुळे पिचवर चांगला बाऊन्स मिळण्याची शक्यता आहे. यामुळे वेगवान गोलंदाजांना काही प्रमाणात मदत मिळू शकते, मात्र फिरकीपटूंना फारशी मदत मिळेल अशी शक्यता कमी आहे.

या स्पर्धेत आतापर्यंत या पिचवर फक्त एकच सामना झाला आहे. 9 फेब्रुवारीला कॅनडा आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात झालेल्या त्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करत 213 धावांचा मोठा स्कोअर उभारला आणि 53 धावांनी विजय मिळवला. त्यानंतर जवळपास एक महिना या पिचवर कोणताही सामना झालेला नाही, त्यामुळे अंतिम सामन्यासाठी पिच पूर्णपणे फ्रेश असणार आहे.

अहमदाबादमध्ये दोन्ही संघांना बसला आहे धक्का

या टी-20 विश्वचषकात भारत आणि न्यूझीलंडचा अंतिम फेरीपर्यंतचा प्रवास काहीसा चढ-उतारांनी भरलेला राहिला आहे. अहमदाबादमध्ये भारताने दोन सामने खेळले असून त्यापैकी एकात विजय मिळवला, तर दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सामन्यात 76 धावांनी पराभव पत्करावा लागला.

न्यूझीलंडनेही येथे 14 फेब्रुवारीला दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सामना खेळला होता. त्या सामन्यात कीवी संघाने 176 धावांचे लक्ष्य दिले होते. मात्र दक्षिण आफ्रिकेने अवघ्या 17.1 षटकांत तीन विकेट्सच्या मोबदल्यात हे लक्ष्य सहज गाठले होते.

हे ही वाचा –

Ind Playing 11 vs Nz Final : कुलदीप IN, वरुण OUT…; तिसऱ्यांदा ट्रॉफी जिंकण्यासाठी हुकमी एक्का खेळणार, फायनलमध्ये अशी असणार टीम इंडियाची प्लेइंग-11

आणखी वाचा

Comments are closed.