टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस तोच गाजवणार…; संजूचा ‘त्या’ फ्लॉप खेळाडूवर अजब भरोसा; न्यूझीलंड

अभिषेक शर्मावर संजू सॅमसन: टी-20 वर्ल्डकप 2026 च्या अंतिम सामन्यात टीम इंडियाने प्रवेश केला आहे. 8 मार्च रोजी भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खिताबी लढत रंगणार आहे. हा महामुकाबला अहमदाबादमधील नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. या स्पर्धेत आतापर्यंत पूर्णपणे फ्लॉप ठरलेला अभिषेक शर्मा पुन्हा एकदा प्लेइंग-11 मध्ये दिसण्याची शक्यता आहे. याचे संकेत सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरलेल्या संजू सॅमसनने दिले आहेत.

संजूला पूर्ण विश्वास आहे की, जरी या संपूर्ण स्पर्धेत अभिषेकचा बॅट शांत राहिला असला तरी न्यूझीलंडविरुद्धच्या फायनलमध्ये तोच सामना जिंकवून देणारा खेळाडू ठरू शकतो. अंतिम सामन्याच्या दिवशी अभिषेक आपला सर्वोत्तम खेळ दाखवत प्रतिस्पर्ध्यांना धक्का देईल, असा विश्वास संजूने व्यक्त केला आहे.

टी-20 वर्ल्ड कपचा शेवटचा दिवस तोच गाजवणार….

संजू म्हणाला, “आमच्या ड्रेसिंग रूममधील वातावरण चांगलं आहे. कर्णधार सूर्या, कोच गंभीर आणि संघातील सर्व खेळाडूंना अभिषेकवर पूर्ण विश्वास आहे. कोणत्याही खेळाडूच्या कारकिर्दीत चढ-उतार येतच असतात. या फॉरमॅटमध्ये फक्त एक-दोन चांगल्या फटक्यांची गरज असते आणि त्याने आत्मविश्वास पुन्हा परत येतो. आम्हाला वाटतं की फायनलचा दिवस अभिषेक शर्माचा असणार आहे. तो मानसिकदृष्ट्या पूर्ण तयार आहे. आम्हाला खात्री आहे की अंतिम सामन्यात तो नक्कीच शानदार कामगिरी करेल आणि टीम इंडियासाठी सामना जिंकणारी खेळी करेल.

-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अभिषेकच्या फक्त 89 धावा (Abhishek Sharma T20 World Cup 2026)

खरं तर ,टी-20 वर्ल्ड कप 2026 मध्ये अभिषेक शर्मा टीम इंडियाचे मोठे शस्त्र मानले जात होते. मात्र या स्पर्धेत त्याची बॅट अजूनही शांतच आहे. त्याने 7 सामन्यांत फक्त 14.16 च्या सरासरीने केवळ 89 धावा केल्या आहेत. झिम्बाब्वेविरुद्ध केलेल्या 55 धावा हीच त्याची एकमेव उल्लेखनीय खेळी ठरली आहे. अमेरिका, पाकिस्तान आणि नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यांत तो खातेही उघडू शकला नाही. या स्पर्धेत त्याने अनुक्रमे 0, 0, 0, 15, 55, 10 आणि 9 अशा धावा केल्या आहेत.

8 पैकी 7 सामने जिंकून भारत फायनलमध्ये

टीम इंडियाने या टी20 वर्ल्ड कप आतापर्यंत 8 सामने खेळले असून त्यापैकी 7 सामन्यांत विजय मिळवला आहे. ग्रुप स्टेजमधील सर्व चार सामने भारताने जिंकले होते. त्यानंतर सुपर-8 फेरीतील पहिल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पराभव पत्करावा लागला, मात्र पुढील दोन सामन्यांत झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिजविरुद्ध शानदार विजय मिळवला.

यानंतर मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर झालेल्या सेमीफायनलमध्ये भारताने इंग्लंडचा 7 धावांनी पराभव करत फायनलमध्ये प्रवेश केला. या सामन्यात भारताने 7 विकेट गमावत 253 धावांचा डोंगर उभा केला होता. प्रत्युत्तर इंग्लंडची टीम 246 धावांपर्यंत मजल मारू शकली.

हे ही वाचा –

Video : एक नव्हे दोन विकेटकीपर ठेवा, अभिषेक शर्माची संजूकडे मागणी, अर्शदीप सिंगचं नाव घेत काय म्हणाला?

आणखी वाचा

Comments are closed.