पोलीस कर्मचाऱ्याने संपवलं जीवन, जळगाव प्रशासनात खळबळ; वरिष्ठ अधिकारी रुग्णालयात दाखल

जळगाव : पोलीस दलात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांवरही कामाचा ताण असतो, अनेकदा याच तणावातून ते टोकाचं पाऊल उचलल्याच्या घटना यापूर्वी घडल्या आहेत. आता, जळगाव एमआयडीसी पोलिस (Police) ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. चाळीसगाव (Jalgaon) तालुक्यातील कोदगाव येथे गळफास घेऊन जीवन संपवलं, या घटनेनं पोलीस प्रशासनात खळबळ उडाली. निलेश पाटील असे मृत पोलिस कर्मचाऱ्याचे नाव कोदगाव येथील घरातच त्यांनी हे टोकाचं पाऊल उचललं. सध्या त्यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला असून आत्महत्येचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.

जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना चाळीसगाव तालुक्यातील कोदगाव येथे घडली असून निलेश पाटील यांच्या अकाली निधनाने पोलीस वर्तुळात खळबळ उडाली आहे. घटनेची माहिती मिळताच संबंधित पोलीस अधिकाऱ्यांनी ग्रामीण रुग्णालयात धाव घेतली असून आत्महत्येमागील कारण शोधण्याचा प्रयत्न सुरू आहे. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतरच पोलिसांच्या तपासाला अधिक गती येईल. तसेच, कुटुंबीय आणि नातेवाईकांकडेही विचारपूस केली जात असल्याची माहिती आहे.

हेही वाचा

Kolhapur : फक्त जळालेली हाडं सापडली, कोल्हापूरमधील सरपंच दोन महिन्यांपासून बेपत्ता, मस्साजोगच्या संतोष देशमुख प्रकरणाची पुनरावृत्ती?

आणखी वाचा

Comments are closed.