हिट अँड रन… दारुच्या नशेत कारचालकाने महिलेला उडवले, रुग्णालयात मृत्यू; 4-5 गाड्याही ठोकल्या
जळगाव : राज्यातील विविध जिल्ह्यात अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली असून दारु पिऊन गाडी चालवणे हेही त्यामागील प्रमुख कारण आहे. त्यातच, हिट अँड रनचा (Hit and run) प्रकार घडतो आहे, पुण्यातील पोर्शे कार अपघातानंतर पुणे पोलिसांनी शहरातील बार आणि रात्री उशिरापर्यंत सुरू असणाऱ्या दारु पार्ट्यांवर बंदी घातली होती. पोलिसांनी बेदरकारपणे वाहन चालवणाऱ्यांवर कारवाईला सुरुवातही केली होती. आता, जळगावमध्ये (Jalgaon) हिट अँड रन चा प्रकार समोर आला असून महाबळ परिसरात भरधाव कारने एका महिलेला धडक दिल्याची घटना गुरुवारी रात्री घडली आहे. या दुर्घटनेत जखमी अवस्थेत महिलेला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान, महिलेचा मृत्यू झाल्याची दु:खद घटना घडली. महिलेच्या कुटुंबीयांनी दिलेल्या फिर्यादीवरुन आरोपीविरुद्ध पोलिसांत (Police) गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जगळगावमध्ये शुक्रवारी रात्री उशिरा हिट अँड रनची घटना घडली असून सीसीटीव्हीत हा प्रसंग कैद झाला आहे. या दुर्घटनेत वंदना सुनील गुजराथी ही महिला गंभीर जखमी झाली होती. त्यामुळे, त्यांना तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. अपघातस्थळावरुन स्थानिकांनी मद्यधुंद अवस्थेत कारचालक तरुणाला पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा करुन मद्यधुंद आरोपीला रात्रीच बेड्या ठोकल्या आहेत. पोलिसांच्या ताब्यात असलेल्या मोटू शिवपाल सैनी या तरुणाविरुद्ध रामानंद पोलीस स्टेशनमध्ये सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या हिट अँड रनचा थरार सीसीटीव्ही कॅमेऱ्यातही कैद झाला असून मद्यधुंद अवस्थेत भरधाव वेगाने तरुणाने काही वाहनांनाही धडक दिल्याचे व्हिडिओतून दिसून येते.
हेही वाचा
कर्जदार महिलेची मुलगी राजस्थानमध्ये विकली, सावकाराचा हैदौस; शिंदेंच्या आमदाराचा खळबळजनक आरोप
आणखी वाचा
Comments are closed.