कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत आता घरगुती गॅसचाही नंबर लागण्याची शक्यता; चूल पेटवावी लागते का? सत

LPG Gas Shortage: इराण-इस्रायल संघर्षाचे पडसाद आता भारतातही उमटू लागले असून त्याचा थेट परिणाम एलपीजी (LPG) पुरवठ्यावर होताना दिसत आहे. केंद्र सरकारने (Central Government) खबरदारीचा उपाय म्हणून व्यावसायिक वापरासाठीच्या एलपीजी सिलेंडरचा पुरवठा तात्पुरता थांबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. या निर्णयामुळे देशभरातील हॉटेल, रेस्टॉरंट आणि फूड इंडस्ट्रीसमोर मोठे संकट निर्माण झाले असून पुढील काही दिवसांत हा उद्योग ठप्प होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अशातच काँग्रेस नेते आणि आमदार सतेज पाटील (Satej Patil) यांनी याबाबत बोलताना म्हटलंय की, कमर्शिअल गॅसवर निर्बंध आणलेत. घरगुती गॅसचा देखील नंबर लागण्याची शक्यता आहे. चूल पेटवावी लागते का? असा प्रश्न आहे. ऑइल कंपन्यांकडे कच्चा माल नाही तर उत्पादन कसे वाढवणार, एकूणच परराष्ट्र धोरण चुकीच्या पद्धतीचे परिणाम आहेत, असंही सतेज पाटील (Satej Patil) यांनी म्हटलं आहे.

गॅसवरती हाॅटेलमध्ये जेवणारे, कामगार पण अवलंबून आहे, व्यवसाय करणाऱ्यांना मोठं नुकसान आहे. हजारो लोकं काम करतात, उद्योग व्यवसाय असो किंवा घरात काय परिस्थिती होईल सांगता येत नाही. महागाईचा परिणाम १०० टक्के लोकांना जाणवणार आहे. पुढील ८-१० दिवसात मध्यमवर्गीयांना सहन करावे लागेल. सरकार सगळं व्यवस्थित चांगलं आहे असं दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. पॅनिक सिचुएशन होऊ नये म्हणून सरकार करत आहे. ग्राऊंड परिस्थिती सगळ्यांना माहिती आहे काय आहे. सभागृहात सरकारनं आश्वासित करावं गॅसचा तुटवडा होणार आहे, सभागृहात आम्ही हा प्रश्न मांडणार आहोत. सरकार माहिती घेत आहे, पुरवठा किती आहे काय आहे? जर तुडवडा नसेल तर अधिकाऱ्यांकडून माहिती का घेतली जात आहे, असंही सतेज पाटलांनी म्हटलं आहे.

व्यवसायिक वापराच्या गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाल्यानं मिठाईच्या किमतीत वाढ करावी लागेल असं मिठाईच्या दुकानदारांचं म्हणणं आहे. पुण्यातील काका हलवाई मिठा गॅसचा पुरवठा पुरेसा होत नसल्यानं मिठाईचे दुकानदार डिझेल किंवा इलेक्ट्रिक शेगड्यांचा पर्याय अवलंबत असले तरी गॅसचा पुरवठा पुरेसा होत नसल्याचा परिणाम व्यवसायावर होऊ लागल्याचं पुण्यातील काका हलवाई मिठाई दुकानाचे मालक युवराज गाढवे यांनी म्हटलंय.

युद्धाच्या झळा मुंबईपर्यंत पोहोचल्या; आज 20 टक्के हॉटेल्स बंद!

गॅसच्या तुटवड्यामुळे मुंबईतील 20% हॉटेल बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल्स बंद होण्याची शक्यता आहे. अमेरिका इस्रायल आणि इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे गॅसचा तुटवडा देशात आणि राज्यात पाहायला मिळत आहे.  गॅसचा तुटवडा मुंबईत आता जाणवण्यास सुरुवात झाल्याने मुंबईतील सद्यस्थितीत दहा ते वीस टक्के हॉटेल्स बंद ठेवण्यात आल्याची माहिती आहार (असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंट) संघटनेकडून देण्यात आली आहे. (Gas Shortage Mumbai)

आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅसचा पुरवठा- (Israel-Iran War Affect Mumbai Hotel)
पुढील तीन दिवस असाच गॅसचा तुटवडा सुरू राहिल्यास मुंबईतील 50% हॉटेल बंद करण्याची वेळ आहार संघटनेवर येईल, असं संघटनेच्या अध्यक्षांकडून सांगण्यात आलं आहे. मुंबईतील विविध ठिकाणी हॉटेल्स मध्ये गॅस पुरवठा कमी असल्याने आज आणि उद्या पुरेल एवढाच गॅसचा पुरवठा आहे. त्यामुळे त्या हॉटेल बंद ठेवावे लागतील, असं असोसिएशन ऑफ हॉटेल अँड रेस्टॉरंटकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

आणखी वाचा

Comments are closed.