बीडच्या नगर रोडवर मारहाणीनंतर संतापाचा उद्रेक; जखमी अवस्थेतील व्यक्तीकडून चहाचा गाडा उलथवला

बीड क्राईम न्यूज : बीड शहरातील नगर रोड परिसरात एका व्यक्तीस अज्ञात कारणावरून मारहाण (Beed Crime News) करण्यात आलीहे. या मारहाणीत संबंधित व्यक्ती गंभीर जखमी होऊन रक्तबंबाळ झाल्याचे पाहायला मिळाले. घटनेनंतर संतापाच्या भरात त्या व्यक्तीने जवळच असलेला चहाचा गाडा उलथून (Crime News) टाकल्याचा प्रकार समोर आलाहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल माध्यमावर व्हायरल (Video Goes Viral) होत आहे. कार्यक्रम घडत असताना मोठा जमाव या ठिकाणी जमला. त्यानंतर पोलिसांना या घटनेची माहिती दिली असता पोलिसांनी कार्यक्रमस्थळ गाठत पुढील कारवाई प्रारंभ केली आहे.

Beed Crime News : मारहाणीमागचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट

मिळलेल्या माहितीनुसारनगर रोडवरील कालिका नगर कमानीसमोर ही घटना घडली. काही अज्ञात व्यक्तींनी संबंधित व्यक्तीला मारहाण केल्याचे सांगितले जात आहे. मारहाणीमुळे तो व्यक्ती रक्तबंबाळ अवस्थेत रस्त्यावर दिसून आला. त्यानंतर त्याने संतापाच्या भरात जवळील चहाच्या गाड्यावर राग काढत तो उलथवून टाकल्याचे व्हिडिओमध्ये दिसून येते. या घटनेदरम्यान काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. स्थानिक नागरिकांनी घटनेचा व्हिडिओ मोबाईलमध्ये कैद केला. दरम्यान, या मारहाणीमागचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली. सध्या पोलीस पुढील कारवाई करत आहेत.

Beed Crime : रस्त्यावर गाडीला साईड देण्याच्या कारणावरून हॉटेल व्यवसायिकावर हल्ला

बीडच्या अंबाजोगाईत स्त्यावर गाडीला साईड देण्याच्या क्षुल्लक कारणावरून हॉटेल व्यावसायिकावर दोघांनी लोखंडी रॉड आणि काठीने हल्ला केल्याची धक्कादायक घटना मुख्य रस्त्यावर घडलीये.अविनाश मेहता असे हॉटेल व्यावसायिकांचे नाव आहे. रस्त्यावर झालेल्या मारहाणीनंतर हल्लेखोरांनी आणखी काहींना सोबत आणत मेहता यांच्या हॉटेलची लोखंडी रॉड काठ्याने तोडफोड करत त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार केल्यास जीवे मारण्याची धमकीही दिली.यानंतर हल्लेखोर मेहता यांचा मोबाईल घेऊन पसार झाले.हॉटेल तोडफोडीची ही घटना सीसीटीव्ही मध्ये कैद झाली आहे.

या मारहाण प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात अविनाश मेहता यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार राहुल भारत ईदगले,पवार व अन्य दोघांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिकचा तपास पोलीस करत आहेत. अंबाजोगाईतील मुख्य रस्त्यावर झालेल्या हल्ल्यामुळे व्यापाऱ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

Gadchiroli Crime : आठ वर्षाच्या चिमुकलीवर अत्याचार, आरोपीला अटक

गडचिरोली : रंगपंचमीच्या दिवशी रंग खेळत असताना एका आठ वर्षीय चिमुकलीला घरात नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार गडचिरोलीच्या कोरची तालुक्यात समोर आला आहे. पाच दिवसांनी ही घटना समोर आली असून आरोपी मोनूकुमार ढेक याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. पीडित मुलगी अनात असून मामा-मामी तिचा सांभाळ करतात. होळीच्या दिवशी आरोपीने मुलीला फुस लावून स्वतःच्या घरात नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. मुलीची मामी तिची आंघोळ करून देत असताना पाच दिवसानंतर हि बाब लक्षात आली तेव्हा मुलीने आपबिती सांगितली. मुलीची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.