पंतप्रधान मोदी महान वैज्ञानिक, नाल्यातून गॅस निर्मितीचा प्रकल्प मिठी नदीवर उभारावा, गॅस टंचाई द

पीएम मोदी नाला गॅसवर संजय राऊत: आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थितीमुळे निर्माण झालेली गॅस टंचाई दूर करण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या संकल्पनेतील नाला गॅस (Nala Gas) प्रकल्प मुंबईतील मिठी नदीवर (Mithi River) उभारावा, अशी खोचक टिप्पणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी केली. पंतप्रधान मोदी हे फार मोठे वैज्ञानिक आहेत, संशोधक आहेत. त्यांनी फार वर्षांपूर्वी एक शोध लावला होता, नाल्यातून गॅस निर्मिती करता येईल. मुंबईतील मिठी नदीच्या किनाऱ्यावर अशाप्रकारचा गॅस उद्योगाचा प्रकल्प मोदींच्या (पीएम मोदी) संकल्पनेतून निर्माण करता येईल का? त्याचं उद्घाटन करायला देवेंद्र फडणवीस आणि मुंबईच्या महापौरांनी नरेंद्र मोदी यांनाच बोलवावं. त्यामधून प्रेरणा घेऊन देशभरात असे अनेक उद्योग निर्माण होतील. आखाती देशांमधील युद्धामुळे गॅसची जी टंचाई निर्माण झाली आहे, ती आम्हाला मोदींच्या कृपेने दूर करता येईल. पण पहिलं उद्घाटन त्यांनी मुंबईतील मिठी नदीवर करावे. त्यासाठी लागणाऱ्या पाईपची व्यवस्था आम्ही शिवसेना म्हणून करायला तयार आहोत. तसेच या प्रकल्पासाठी कोणतंही अनुदान लागलं तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी ते मंजूर करावे, असे संजय राऊत यांनी म्हटले. ते बुधवारी दिल्लीत आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते. यावेळी संजय राऊत यांनी देशातील गॅस टंचाईच्या मुद्द्यावरुन पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारला लक्ष्य केले.

देशात सगळ्यात मोठा विषय सध्या इराण इस्राएल युद्धामुळे भारतात निर्माण झालेली परिस्थिती हा आहे. देशात गॅसची मोठी टंचाई जाणवायला सुरुवात झाली आहे. मोदी सरकारकडून सांगण्यात आले होते की, या युद्धाचा भारतावर कोणताही परिणाम होणार नाही. पण सरकारने जनतेला दिलेले हे आश्वासन फोल ठरले. मुंबईसारख्या शहरात गॅस टंचाईमुळे 30 टक्के रेस्टॉरंट आणि हॉटेल्स बंद आहेत. व्यावसायिक गॅसपुरवठा ठप्प झाल्याने वाहन उद्योगाचे मोठे नुकसान झाले आहे. सातारा आणि सांगली येथील इंजिनिअरिंग उद्योग पूर्णपणे बंद आहेत. चाकणमधील वाहन उद्योग अडचणीत आला आहे, असे संजय राऊत यांनी म्हटले.

पंतप्रधान मोदी यांचं जे भारताला 100 वर्ष मागे घेऊन जाण्याचं स्वप्न  आहे, ते पूर्ण करत आहेत. त्यांची संस्कृती हीच आहे की, विज्ञान नष्ट करुन नाल्यातून गॅस निर्माण करायचा. काल अमेरिकेच्या प्रेस सेक्रेटरी यांनी एक वक्तव्य केले. भारत एक उत्तम अॅक्टर आहे, असे त्या म्हणाल्याकडे संजय राऊत यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

आणखी वाचा

मोठी बातमी: युद्धामुळे केटरर्सकडे गॅसचा प्रचंड तुटवडा, राज्यातील 10 हजार लग्नं पुढे ढकलावी लागणार, जेवणाचा दरही महागणार?

आणखी वाचा

Comments are closed.