साळुंखे पाटलांनी गेम फिरवला, शेकापच्या 55 वर्षाच्या गडाला सुरुंग, पंचायत समितीवर भाजपचा झेंडा
सोलापूर सनोला बातम्या : पंचायत समितीच्या सभापती निवडीपूर्वीच सांगोल्यात पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा करिष्मा पाहायला मिळत आहे. माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांच्या गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी आज मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या प्रवेशामुळे आता सांगोला पंचायत समितीवर भाजप आणि शिंदे सेनेची सत्ता येणार हे उघड झाले आहे. शेकापची 55 वर्षाची सत्ता उद्या संपुष्टात येणार आहे.
शेकापला सहा आणि दीपक साळुंखे गटाला तीन जागा मिळाल्या होत्या
आज पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या उपस्थितीत दीपक आबा साळुंखे पाटील गटाच्या पंचायत समिती सदस्य पुनम इंगोले, अशोक चोरमुले व बापू जावीर या तीन सदस्यांनी मुंबई येथे भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये सांगोल्यात भाजप आणि शहाजी बापूंची शिवसेना एकत्रित लढली होती. तर सांगोल्याचे शेकाप आमदार बाबासाहेब देशमुख यांनी माजी आमदार दीपक साळुंखे यांच्यासोबत आघाडी करुन निवडणूक लढवली होती. यामध्ये शेकाप आघाडीने 14 पैकी नऊ जागा जिंकत बहुमत मिळविले होते. यामध्ये शेकापला सहा आणि दीपक साळुंखे गटाला तीन जागा मिळाल्या होत्या.
भाजपला एक आणि शहाजी बापूंच्या शिवसेनेने चार जागा जिंकल्या होत्या
भाजपला एक आणि शहाजी बापूंच्या शिवसेनेने चार जागा जिंकल्या होत्या. आता दीपक साळुंखे गटातील तीन पंचायत समिती सदस्यांनी थेट भाजपमध्ये प्रवेश केल्याने सांगोला पंचायत समितीवर भाजप शिवसेनेचे बहुमत झाले आहे. उद्या होणाऱ्या निवडीमध्ये भाजपमध्ये प्रवेश केलेल्या पुनम इंगोले यांचे नाव सभापती पदासाठी जवळपास निश्चित झाल्याचे समजते आहे. तर उपसभापती पदासाठी शिंदे सेनेचे अजय सरगर यांचे नाव निश्चित झाल्याची माहिती आहे.
आणखी वाचा
Comments are closed.