आयपीएलच्या 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर, कोहली, धोनी आणि रोहित शर्माचा पहिला सामना कधी?
नवी दिल्ली : IPL 2026 च्या 20 सामन्यांचं वेळापत्रक बीसीसीआयनं जारी केलं आहे. आयपीएलच्या 19 व्या पर्वाचा पहिला सामना रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि सनरायजर्स हैदराबाद यांच्यात होणार आहे. म्हणजेच विराट कोहली आयपीएलच्या 19 व्या हंगामातील पहिला सामना खेळणार आहे. आरसीबीनं 18 व्या हंगामाचं विजेतेपद पंजाब किंग्जला फायनलमध्ये पराभूत करुन मिळवलं होतं. विजयाची मालिका कायम ठेवण्याचं त्यांच्यासमोर आव्हान आहे.
महेंद्रसिंह धोनी आणि रोहित शर्मा यांच्या चाहत्यांचं लक्ष देखील त्यांचे सामने कधी आहेत, याकडे लागलं आहे. रोहित शर्मा आणि एमएस धोनी आयपीएलचा सामना कधी खेळणार हे जाणून घेऊयात
रोहित शर्माला मुंबई इंडियन्सनं 16.30 कोटी रुपये मोजून रिटेन केलं आहे. मुंबई इंडियन्सचा यंदाच्या आयपीएलमध्ये पहिला सामना 29 मार्चला कोलकाता नाईट रायडर्स विरोधात मुंबईत होणार आहे. रोहित शर्मा आयपीएलच्या दुसऱ्याच दिवशी मैदानावर पाहायला मिळेल.
महेंद्रसिंह धोनीला चेन्नई सुपर किंग्जनं 4 कोटी रुपयांमध्ये रिटेन केलं आहे. चेन्नई सुपर किंग्जचा पहिला सामना 30 मार्चला राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुवाहाटीत होणार आहे. महेंद्रसिंह धोनी तो सामना खेळताना पाहायला मिळू शकतो.
रोहित शर्मानं शेवटचा वनडे सामना न्यूझीलंड विरुद्ध खेळला आहे. त्या तीन सामन्यांच्या मालिकेत रोहित शर्मा 61 धावा करु शकला होता. त्यानंतर रोहित शर्मा आता थेट आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सकडून खेळताना पाहायला मिळेल. रोहित शर्मानं आयपीएल 2025 मध्ये 15 सामन्यात 418 धावा केल्या होत्या. यामध्ये त्यानं चार अर्धशतकं केली होती.
दुसरीकडे महेंद्रसिंह धोनी आता फक्त आयपीएलमध्ये खेळतो. गेल्या वर्षीच्या हंगामात त्यानं 196 धावा केल्या होत्या. 2025 च्या आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्ज आणि महेंद्रसिंह धोनीची कामगिरी निराशाजनक राहिली होती. धोनीचा गेल्या हंगामातील बेस्ट स्कोअर 30 इतका होता. तर, विराट कोहलीनं 18 व्या हंगामात 657 धावा केल्या होत्या.
आयपीएलच्या
20 सामन्यांचं वेळापत्रक
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 28 मार्च, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, मुंबई (सायं.7.30 वाजता)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 30 मार्च, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, न्यू चंदीगड, (सायं.7.30 वाजता)
लखनौ सुपर जायंटस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 1 एप्रिल, लखनौ (सायं.7.30 वाजता)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद,2 एप्रिल,कोलकाता (सायं.7.30 वाजता)
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज,3 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, दिल्ली (दुपारी 3.30 वाजता)
गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 4 एप्रिल, अहमदाबाद (सायं.7.30 वाजता)
सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 5 एप्रिल, हैदराबाद, (दुपारी 3.30 वाजता)
रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 6 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 8 एप्रिल, दिल्ली (सायं.7.30 वाजता)
कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 9 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 11 एप्रिल, न्यू चंदीगड (दुपारी 3.30 वाजता)
चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 11 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
लखनौ सुपर जायंटस विरुद्ध गुजरात टायटन्स, 12 एप्रिल, लखनौ (दुपारी 3.30 वाजता)
मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 एप्रिल, मुंबई (सायं.7.30 वाजता)
Comments are closed.