मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आप

विधान भवन महाराष्ट्र मुंबई : मुंबई विधानभवन कार्यालयाच्या अधिकृत साईटवर अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा ई-मेल पाठवल्याने एकच खळबळ उडाली आहे. धमकीचा ईमेल आल्यानंतर पोलिसांनी विधानभवन परिसरात सर्च आपरेशन सुरू केले आहे. सध्या विधानभवनातील कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आलं आहे. सर्च ऑपरेशन होईपर्यंत कोणालाच आत सोडले जाणार नाही, असं पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. सध्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असून मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्री आणि व्हीआयपी या परिसरात येत असतात. त्यामुळे पोलिसांकडून शोध मोहीम सुरु आहे.

आणखी वाचा

Comments are closed.