मेट्रो, शेअर बाजारसह मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देऊ, अज्ञात व्यक्तीकडून धमकीचा मेल; सभापत

विधान भवन मुंबईत बॉम्बस्फोटाच्या धमकीवर राम शिंदे विधानभवन परिसरात आज सकाळी एकच खळबळ उडाल्याचे दिसून आले. विधिमंडळ बॉम्बने उडवून देऊ, असा धमकीचा मेल (Bomb Threat Vidhan Bhavan) आला होता. या मेलनंतर पोलिसांनी तात्काळ संपूर्ण विधानसभा परिसरात सर्च ऑपरेशन सुरु केले. यावेळी सुरुवातील विधानसभा कर्मचाऱ्यांना बाहेर रोखण्यात आले. त्यानंतर थोड्यावेळाने आयडी आणि तपासणी केल्यानंतर पोलिसांकडून विधानभवनातील कर्मचाऱ्यांना विधानसभेत सोडण्यात आले. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

आज सकाळी सीपीएच्या मेलवर धमकी आली. अर्थसंकल्पीय अधिवेशन असल्यामुळे बॉम्ब आणि मिसाईलची धमकी होती.  बॉम्ब डिस्पोजल स्कॉडने सर्व सखोल तपास सुरू केली आहे. आणखीन चार ठिकाणी धमकी दिली आहे, पोलिसांनी आवश्यक ती दखल घेतली आहे, अशी माहिती विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी दिली.

मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देण्याची धमकी- (Ram Shinde On Bomb Threat Vidhan Bhavan)

सुरक्षा अधिकारी काळजी घेत आहेत, धमकीच्या पार्श्वभूमीवर तपास सुरू आहे. अधिकची माहिती एवढ्या लवकर उघड करण योग्य होणार नाही. चौकशी अंती सर्व माहिती दिली जाईल, असं राम शिंदेंनी सांगितले. तसेच शेअर बाजार, उच्च न्यायालय, मेट्रो आणि बँक उडवून देण्याची धमकी मेलद्वारे देण्यात आली आहे. आज सकाळी 6.57 मिनिटांनी धमकीचा मेल आला होता, असं राम शिंदे म्हणाले.

मुंबईतील 4 ठिकाणं मिसाईलने उडवून देण्याची धमकी- (Ram Shinde On Bomb Threat Vidhan Bhavan)

विधिमंडळ, मेट्रो, बॉम्बे स्टॉक एक्सचेंजला धमकी देणारा मेल खलिस्तानी आंदोलकांशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. धमकी देणाऱ्याने मिसाईल आणि बॉम्बने संबंधित ठिकाणं उडवून देण्याचं मेलमध्ये नमूद केलं. सकाळी 6 वाजून 57 मिनिटांनी मेल आल्यानंतर तत्काळ सुरक्षेच्या गृह विभागाकडून सूचना देण्यात आल्या.

संबंधित बातमी:

Bomb Threat Vidhan Bhavan मोठी बातमी: विधानभवनात बॉम्ब ठेवल्याची धमकी, सगळ्यांना बाहेर रोखलं, पोलिसांकडून परिसरात सर्च आपरेशन सुरू, नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.