वंशाला दिवा पाहिजे, तीन मुली झाल्या म्हणून सासरच्याचं सुनेसोबत भयानक कृत्य, नवऱ्याच्या दुसऱ्या
बीड: बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. वंश वाढीसाठी मुलगाच हवा, या मागासलेल्या मानसिकतेतून एका २६ वर्षीय विवाहितेचा (Beed Crime News) बळी गेल्याची धक्कादायक घटना बीड जिल्ह्यात समोर आली आहे. तीन मुली झाल्याच्या कारणावरून सासरच्यांकडून होणाऱ्या सततच्या (Beed Crime News) छळाला कंटाळून भक्ती अमोल कोरडे (रा. म्हाळसापूर, ता. बीड) या विवाहितेने कीटकनाशक प्राशन केले होते. महिनाभर मृत्यूशी झुंज दिल्यानंतर अखेर ६ मार्च रोजी खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. याप्रकरणी पती, सासू आणि सासऱ्याविरुद्ध पिंपळनेर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.(Beed Crime News)
Beed Crime News: नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, मयत भक्ती कोरडे हिचा विवाह म्हाळसापूर येथील अमोल कोरडे याच्याशी झाला होता. लग्नानंतर त्यांना तीन मुली झाल्या. मात्र, मुलगा होत नसल्याच्या कारणावरून मागील अडीच वर्षांपासून भक्तीचा छळ सुरू झाला होता. “तुला फक्त मुलीच होतात, घराण्याला वारस हवा आहे,” असे म्हणत पती अमोल, सासरा अर्जुन साधू कोरडे आणि सासू आशाबाई अर्जुन कोरडे हे तिला वारंवार शारीरिक आणि मानसिक त्रास देत होते.(Beed Crime News)
Beed Crime News: दुसऱ्या लग्नासाठी बाँड पेपरवर सक्ती
सासरच्या मंडळींचा छळ इतक्यावरच थांबला नाही. पती अमोल याला दुसरे लग्न करायचे असल्याने भक्तीने त्याला संमती द्यावी, यासाठी तिच्यावर दबाव टाकला जात होता. “तू दुसऱ्या लग्नाला परवानगी दे आणि तसे बाँड पेपरवर लिहून दे,” अशी सक्ती करत तिला वारंवार मारहाण केली जात असे. या सततच्या त्रासामुळे आणि अपमानामुळे भक्ती प्रचंड मानसिक तणावाखाली होती.(Beed Crime News)
Beed Crime News: महिनाभर मृत्यूशी झुंज
सासरच्या छळाला कंटाळून भक्तीने २ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी आपल्या राहत्या घरी कीटकनाशक प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. तिची प्रकृती खालावल्याने तिला तातडीने बीड येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. प्रकृती अधिक गंभीर झाल्याने तिला पुढील उपचारासाठी खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. महिनाभर उपचार सुरू असतानाही प्रकृतीत सुधारणा झाली नाही आणि ६ मार्च रोजी तिने अखेरचा श्वास घेतला.
भक्तीच्या मृत्यूनंतर तिची आई गंगूबाई प्रभू ठोकळ यांनी पिंपळनेर पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी पती अमोल कोरडे, सासरा अर्जुन कोरडे आणि सासू आशाबाई कोरडे यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक अर्जुन घोलवाल करत आहेत. मुलगा-मुलगी समान मानण्याच्या काळातही केवळ मुली झाल्या म्हणून एका महिलेला जीव गमवावा लागल्याने बीड जिल्ह्यात संताप व्यक्त केला जात आहे.
आणखी वाचा
Comments are closed.