पत्नीनेच प्रियकर अन् भावाच्या मदतीने काढला पतीचा काटा, पत्नीसह सात जणांना अटक, निफाड हादरलं!
नाशिक क्राईम न्यूज : नाशिक जिल्ह्यातील निफाडच्या उगाव इथं एक अतिशय धक्कादेणारा खुनाची कार्यक्रम घडली आहे. यात प्रियकर आणि भावाच्या मदतीने पत्नीनेच पतीची हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार घडलाय. पोलीस तपासात समोर आलेल्या या प्रत्यक्षात गावात एकच खळबळ उडाली आहे. नाशिक पोलिसांनी या प्रकरणी पत्नीसह सात जणांना अटक केली आहे. तर सध्या पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या चांदवड तालुक्यातील परसुल येथे निफाडच्या उगाव येथील शादाब रज्जाक तांबोळी या बेपत्ता युवकाचा मृतदेह आढळून आला होता. पोलिसांनी शिताफीने तपासचक्रे फिरवले असता पत्नीनेच प्रियकर व भावाच्या मदतीने हत्या केल्याचे समोर आलंय. पोलिसांनी घटनास्थळ व तांत्रिक तपास करत एकूण पत्नीसह सात संशयितांना अटक केली आहे. सध्या या हत्येमागील नेमकं कारण काय? हे सध्या पोलीस तपास करत असून पुढील कारवाई पोलीस करत आहेत.
Bhandara Crime : भंडाऱ्यातून 17 वर्षीय तरुणी दोन दिवसांपासून बेपत्ता; मुलीचं अपहरण केल्याची वडिलांची पोलिसात तक्रार
मामाच्या घरून स्व:गावी जाण्यासाठी निघालेली 17 वर्षीय तरुणी मागील दोन दिवसांपासून बेपत्ता झाली आहे. तिचा सर्वत्र शोध घेतल्यानंतर ती कुठेही आढळून नं आल्यानं वडिलांनी या प्रकरणी मुलीचं अपहरण झाल्याची तक्रार जवाहरनगर पोलिसात दाखल केली आहे. बारावीची परीक्षा संपल्यानंतर भंडाऱ्याच्या नांदोरा येथील मामाकडे राहिल्यानंतर 17 वर्षीय तरुणी ही तुमसर तालुक्यातील सोरना या स्व:गावी जाण्यासाठी निघाली होती. मात्र, ती गावी पोहचली नाही आणि तिचा मोबाईल बंद दाखवत असल्यानं कुटुंबियांनी तिचा सर्वत्र शोध घेतला. ती कुठंही आढळून आली नसल्यानं वडिलांनी या प्रकरणी जवाहरनगर पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीवरून अज्ञाताच्या विरोधात मुलीच्या अपहरणाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास जवाहरनगर पोलिस करीत आहे.
नाशिक न्यूज : पंचवटी एक्सप्रेसमध्ये रमजाननिमित्त इफ्तार पार्टी; प्रवासी संघटनेतर्फे रोजा सोडण्याचा अनोखा उपक्रम
मनमाड ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस दरम्यान धावणाऱ्या पंचवटी एक्सप्रेसने 51 व्या वर्षात पदार्पण केले असताना रमजान महिन्याच्या पार्श्वभूमीवर या गाडीत इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले..मुस्लिम बांधवांचा रोजा सुरू असल्याने मनमाड, लासलगाव, निफाड, नाशिक आणि कसारा येथून अपडाऊन करणाऱ्या प्रवासी संघटनेतर्फे हा उपक्रम राबविण्यात आला. सायंकाळी ६ वाजून ५ मिनिटांनी एकत्रित प्रार्थना करत रोजा सोडण्यात आला. यावेळी जगात शांतता नांदो आणि ईराण–इस्रायल युद्ध थांबावे यासाठीही देवाकडे प्रार्थना करण्यात आली. राष्ट्रगीत आणि वंदे मातरमच्या घोषणांनी वातावरण देशभक्ती आणि सौहार्दाने भारावून गेले.
इतर महत्वाच्या बातम्या
आणखी वाचा
Comments are closed.