परदेशी खेळाडूचा PSL लाथ मारत IPL खेळण्याचा निर्णय; पाकिस्तानच्या तळपायाची आग मस्तकात गेली, पीसी
मुझराबानी आयपीएल करारासाठी पीएसएल सोडले पाकिस्तान सुपर लीगच्या (Pakistan Super League) 11व्या हंगामाची सुरुवात 26 मार्चपासून होणार असतानाच पाकिस्तान क्रिकेटला मोठा धक्का बसला आहे. ब्लेसिंग मुझाराबानी (Blessing Muzarabani) या झिम्बाब्वेच्या वेगवान गोलंदाजाने PSL सोडून आयपीएल (Indian Premier League) मध्ये खेळण्याचा निर्णय घेतला आहे. मुझाराबानीच्या या निर्णयामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्ड (PCB) संतप्त झाले असून त्याच्यावर कठोर कारवाई करण्याची तयारी सुरू आहे. त्यामुळे या वेगवान गोलंदाजावर बंदीची टांगती तलवार दिसू लागली आहे. (Blessing Muzarabani IPL 2026 News)
मुझाराबानीवर PCB करणार कारवाई
प्रत्यक्षात मुजरबानीला PSL मधील इस्लामाबाद युनायटेड या संघाने शामार जोसेफच्या जागी आपल्या ताफ्यात सामील केले होते. त्यामुळे तो PSL 2026 मध्ये तीन वेळा विजेता ठरलेल्या इस्लामाबाद युनायटेडसाठी खेळणार होता. मात्र आयसीसी पुरुष टी-20 विश्वचषक 2026 मध्ये केलेल्या दमदार कामगिरीनंतर परिस्थितीच बदलली. मुजरबानीने या स्पर्धेत 6 सामन्यांत 13 विकेट्स घेतल्या, ज्यात ऑस्ट्रेलियाविरुद्ध 4 विकेट्सची भेदक कामगिरीही होती. याच शानदार प्रदर्शनामुळे कोलकाता नाइट रायडर्स या संघाने त्याला आयपीएलसाठी आपल्या ताफ्यात घेतले. केकेआरने जानेवारीमध्ये मुस्तफिझुर रहमानला रिलीज केले होते आणि त्याच्या जागी मुजरबानीची निवड केली.
ब्लेसिंग मुझाराबानीने PSL चा करार मोडून IPL मध्ये खेळण्याचा निर्णय घेतल्याने PCB खूप नाराज आहे. पाकिस्तानी मीडियातील वृत्तांनुसार, PCB त्याच्यावर कडक कायदेशीर कारवाई करण्याचा विचार करत आहे. विशेष म्हणजे असा प्रकार सलग दुसऱ्या वर्षी घडत आहे. मागील हंगामात कॉर्बिन बॉशने PSL सोडून मुंबई इंडियन्समध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर त्याच्यावर एक हंगामासाठी PSL मधून बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे मुझाराबानीवरही एक वर्षाची बंदी लागू शकते, असे वृत्त आहे.
ब्लेसिंग मुजरबानीची शानदार आकडे
झिम्बाब्वेसाठी आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणाऱ्या ब्लेसिंग मुजरबानीला मागील वर्षी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूने लुंगी एन्गिडीच्या रिप्लेसमेंट म्हणून संघात घेतले होते. मात्र त्या वेळी त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नव्हती. आतापर्यंत त्याने 89 आंतरराष्ट्रीय टी-20 सामन्यांतील 86 डावांमध्ये 21.34 च्या सरासरीने 106 विकेट्स घेतल्या आहेत. या काळात त्याचा इकॉनॉमी रेट 7.24 इतका राहिला आहे, जो या फॉरमॅटमध्ये खूप चांगला मानला जातो.
हे ही वाचा –
आणखी वाचा
Comments are closed.