वि’चित्रा’ ताई, 25 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? रोहिणी खडसेंचा चित

Rohini Khadse on Chitra Wagh: इराण- इस्रायलमधील तणावाच्या पार्श्वभूमीवर देशभरात गॅस सिलेंडरचा तुटवडा (LPG Crisis) जाणवू लागला आहे. गॅस सिलेंडरच्या तुटवड्याच्या मुद्द्यावरून महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले. काँग्रेस नेते नाना पटोले (Nana Patole), विजय वडेट्टीवार (Vijay Wadettiwar) यांनी विधिमंडळाच्या पायऱ्यांवर गॅस सिलेंडरची प्रतिकृती हाती घेत निदर्शने केली. यावेळी भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra Wagh) यांनी एलपीजीचा पुरवठा सुरळीतपणे सुरू असल्याचे म्हटले. आता या मुद्द्यावरून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे (Rohini Khadse) यांनी भाजप आमदार चित्रा वाघ यांच्या निशाणा साधलाय. सिलिंडर येत नाही तोपर्यंत 12 दिवस आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? वि’चित्रा’ ताई ? असा सवालही त्यांनी केला आहे.

आपल्या एक्स हँडलवर रोहिणी खडसे यांनी या संदर्भात पोस्ट केली आहे. या पोस्टमध्ये रोहिणी खडसे यांनी म्हटले आहे की, काल गॅस सिलिंडरच्या तुटवड्यावर काँग्रेस नेते आंदोलन करत असताना वि’चित्रा’ ताई तिथे टपकल्या आणि सवयीप्रमाणे नाक खुपसले. वि’चित्रा’ ताई म्हणाल्या की, सिलिंडर आहेत.. 25 दिवसांत मिळते सिलिंडर.. बुक करायला सांगा…

Rohini Khadse on Chitra Wagh: सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का?

अहो विचित्रा ताई… जर एका सामान्य गृहिणीच्या घराचा गॅस, आज संपला असेल तर त्यांनी काय करावं? 25 दिवस वाट पहावी का ? बरं पाहतो वाट ! पण मग गॅस येईपर्यंत आम्ही सामान्य माणसांनी तुमच्या घरी जेवायला यायचं का? वि’चित्रा’ ताई?, असे म्हणत रोहिणी खडसे यांनी चित्रा वाघ यांच्यावर हल्लाबोल केलाय. आता रोहिणी खडसे यांच्या टीकेवर चित्रा वाघ काय प्रत्युत्तर देणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Saamana Agralekh On Gas Shortage: सरकार गॅस उत्पादन वाढल्याच्या वल्गना करते अन् बुकिंगचा कालावधी वाढवते, सरकार कुणाला फसवतंय? ‘सामना’तून केंद्रावर निशाणा

इराणी क्षेपणास्त्रांचा सौदीतील अमेरिकन तळावर मोठा हल्ला; हवेत इंधन भरणाऱ्या पाच टँकर विमानांची दाणादाण! हजारो कोटींच्या मालमत्तेची राखरांगोळी; काल इराकमध्येही तेच विमान जमीनदोस्त

आणखी वाचा

Comments are closed.