देवेंद्र फडणवीसांनी पुन्हा ठणकावून सांगितलं, म्हणाले, ‘LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस

गॅस टंचाईवर देवेंद्र फडणवीस : मध्यपूर्वेतील युद्धजन्य परिस्थितीमुळे देशभरातील गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून अनेक ठिकाणी पुरवठा विस्कळीत (LPG Crisis) झाल्याचे चित्र आहे. या परिस्थितीच्या झळा महाराष्ट्रातही पोहोचल्याने राज्यात गॅस टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. सरकारकडून गॅस पुरवठा सुरळीत असल्याचा दावा करण्यात येत असला, तरी प्रत्यक्षात अनेक भागांत ग्राहकांना वेळेवर सिलेंडर मिळत नसल्याच्या तक्रारी वाढत आहेत. बुकिंग करूनही गॅस उपलब्ध होत नसल्याने नागरिकांना गॅस एजन्सीसमोर तासन्‌तास रांगेत उभे राहावे लागत आहे. राज्यातील अनेक शहरांमध्ये पहाटेपासूनच गॅस एजन्सी कार्यालयांबाहेर ग्राहकांची मोठी गर्दी होत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. आता या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गॅस पुरवठ्याबाबत सविस्तर भाष्य केलंय. LPG गॅसची कोणतीही कमतरता नाही, काँग्रेस पक्ष लोकांच्या मनात भीती तयार करतोय, असा आरोप त्यांनी केलाय.

Devendra Fadnavis on Gas Shortage: नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात कुठेही गॅसची टंचाई नाही. असं आहे की, काहीजण विशेषत: काँग्रेस पक्ष जाणीवपूर्वक लोकांमध्ये भीती तयार करुन त्यांनी रांगा लावाव्यात, असा प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार, गॅस कंपन्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे की, घरगुती गॅस पुरवठ्याबाबत कोणतेही संकट नाही. महिन्याला जितका गॅस लागतो, तितका पुरवला जात आहे. त्यामुळे गॅस पुरवठ्याबाबत कोणीही चिंता करु नये. लोकांनी विनाकारण रांगा लावू नयेत.  ऑनलाईन गॅस बुकिंग सुरु आहे. लोकांना वेळेत गॅस देण्यासाठी एलपीजी सिलेंडर उपलब्ध आहेत. पण आपल्याच देशात पॅनिक तयार करण्याची काँग्रेसची बुद्धी देशासाठी विघातक आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Devendra Fadnavis on Gas Shortage: गॅस वितरणाबाबत सरकारच्या वतीने नियमावली जारी

गॅस तुटवड्यावर तोडगा काढण्यासाठी राज्य सरकारने नियमावली जाहीर केली आहे. सर्वत्र गॅस घेण्यासाठी पळापळ सुरू असताना कोणत्या भागात कशा पद्धतीने गॅस पुरवठा करायचा याच संदर्भात आदेश जारी करण्यात आले आहेत. राज्य सरकारच्या वतीने प्रमुख्याने रुग्णालये, शासकीय आश्रम शाळा, अनुदानित आश्रम, शाळा वसतिगृह, शासकीय खानावळ, मध्यान्ह भोजन, अंगणवाडी अशा सर्व संस्थांना शंभर टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या सर्व संदर्भात गॅस एजन्सीला दैनंदिन अहवाल सादर करण्याचे आदेश देखील देण्यात आले आहे. तसेच, सार्वजनिक सेवेतील संस्थांना 100 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे. राज्यातील उपाहारगृहांना 70 टक्के पुरवठा करण्यात यावेत असा आदेश देण्यात आलेय. तर औषध उद्योग 50 टक्के, बीज प्रक्रिया 50 टक्के, मत्स्य पालन व्यवसायांना 50 टक्के गॅस पुरवठा करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. रेल्वे, संरक्षण क्षेत्र, पोलीस दल, हवाई वाहतुकीला 70 टक्के गॅस पुरवठा केला जाणार आहे.

आणखी वाचा

मोठी बातमी : LPG गॅसला पर्याय सापडला, पुण्यातील शास्त्रज्ञांचा दावा, 20 वर्षांच्या संशोधनाला यश!

आणखी वाचा

Comments are closed.