अमेरिकेचे नेतेही सांगतात, जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये; फडणवीसांनी दिलं उदाहरण
नागपूर: भारताचे शिप हामुर्झमधून येत आहे, याचा आनंद आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय परिस्थिती पाहता या गोष्टींवर केंद्र सरकार अधिकृतरित्या मत व्यक्त करेल. मात्र, जे मोदींच्या (Narenra Modi) क्षमतेवर शंका व्यक्त करत होते, त्यांना मोदींनी आपल्या कृतीतून उत्तर दिले आहे, असे म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी इराणच्या (Iran) भूमिकेचं स्वागत केलं. तसेच, अमेरिकेतील नेतेही सांगत आहेत की, आज जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे. त्यामुळे, आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी ही स्थिती समजून घेतली पाहिजे आणि गप्प राहिले पाहिजे, असेही फडणवीसांनी (Devendra Fadnavis) म्हटले.
जागतिक व्यापाराची जीवनवाहिनी मानली जाणारी ‘स्ट्रेट ऑफ होर्मुझ’ (Strait of Hormuz) सध्या जगातील सर्वात धोकादायक ठिकाण बनली आहे. या सागरी मार्गावर इराणने आपले नियंत्रण घट्ट केले असून, अमेरिकेच्या वाढत्या लष्करी लष्करी हालचालींमुळे येथे कधीही मोठा भडका उडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. इराणने अधिकृतपणे हा मार्ग पूर्णपणे बंद केला नसला तरी, त्यांनी एक ‘नवी चाल’ खेळली आहे. इराण केवळ त्यांच्या अटी मान्य करणाऱ्या आणि मित्रराष्ट्रांच्या जहाजांनाच या मार्गातून जाण्याची परवानगी देत आहे. भारताने आपल्या मुत्सद्देगिरीच्या जोरावर मोठा विजय मिळवल्याचे बोलले जात आहे. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने इराणसोबत केलेल्या यशस्वी चर्चेनंतर, भारतीय ध्वज असलेल्या तेलवाहू जहाजांना ‘सुरक्षित मार्ग’ देण्यात आल्याचा दावा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीसांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींचं कौतुक केलंय. अमेरिकेतील नेतेही सांगत आहेत की, आज जगात संघर्ष थांबवण्याची क्षमता मोदींमध्ये आहे. त्यामुळे, आपल्या देशातील बडबड आणि फडफड करणाऱ्या नेत्यांनी ही स्थिती समजून घेतली पाहिजे आणि गप्प राहिले पाहिजे, असेही फडणवीसांनी म्हटले.
आखाती देशातील युद्धजन्य परिस्थितीमुळे भारतातील इंधन पुरवठा आणि गॅस पुरवठ्यावर मोठा परिणाम झाल्याचं पाहायला मिळत आहे. गॅस वितरणाच्या त्रुटीमुळे गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी झाल्याचं दिसून येतं. त्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री फडणवीस यांनी काँग्रेसलाही लक्ष्य केलं. गॅस एजन्सीबाहेर नागरिकांची गर्दी होत नाही. तर काँग्रेसच्या नेत्यांनी लोकांमध्ये जो पॅनिक तयार केला आहे, त्यामुळे ही गर्दी होत आहे. मोठ्या प्रमाणात लोकांमध्ये पॅनिक निर्माण करण्याचा षडयंत्र काँग्रेसने केलंय, असा आरोप फडणवीस यांनी केलाय.
गॅस एजन्सीबाहेरील रांगा काँग्रेसचं षडयंत्र
वारंवार देशाच्या सरकारने सांगितले आहे की, घरगुती गॅस, पेट्रोल, डिझेल याचा तुटवडा आपल्याकडे नाही. रेशनिंगही करण्यात आलेलं नाही. मात्र, तरीही काँग्रेसकडून लोकांना भडकवले जात आहे, रांगा लावायला लावल्या जात आहेत, हे षडयंत्र आहे, असे फडणवीसांनी म्हटले. त्यावर, काँग्रेसचे षडयंत्र असल्याचा तुमचा आरोप आहे, याचे काही पुरावे आहे का? असा प्रश्न मुख्यमंत्र्यांना विचारण्यात आला होता. त्यावर, पुरावे काय द्यायचे? स्वतः राहुल गांधी सांगत आहेत, नाना पटोलेही तेच करत आहे, वडेट्टीवारही तेच करत आहेत आणखी किती पुरावे पाहिजे? असा प्रतिसवालच फडणवीसांनी केला.
हेही वाचा
आणखी वाचा
Comments are closed.