महाराष्ट्रातील भाविकांना महाशिवरात्रीलाही शंकराचं दर्शन घेऊ दिलं नाही, पण UPच्या खासदारासाठी…
पुणे भीमाशंकर दर्शन: बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या भीमाशंकर मंदिरात (Bhimashankar) व्हीआयपी दर्शनावरून वाद निर्माण झाला आहे. मंदिर दुरुस्तीच्या कामामुळे सर्वसामान्य भाविकांसाठी गेल्या अडीच महिन्यांपासून मंदिर बंद ठेवण्यात आले आहे. परिणामी नियमप्रमाणे कुठल्याही भाविकाला मंदिरात प्रवेश आणि भेट द्या घेता येत नाहीये. असे असताना मात्र भाजपचे खासदार डॉ. निशिकांत दुबे (BJP MP Nishikant Dubey) यांच्यासाठी हे मंदिराचे उद्घाटन करून थेट व्हीआयपी दर्शन देण्यात आल्याचा आरोप होत आहे. डॉ. निशिकांत दुबे हे झारखंड च्या गोड्डा मतदार संघातून चार वेळा भापकडून निवडून आलेले खासदार आहेत्यामुळे. या व्हीआयपी दर्शनावरून (VIP Darshan) भीमाशंकर मंदिर प्रशासन वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. (भाजप खासदार निशिकांत दुबे यांच्यासाठी भीमाशंकर मंदिर खुले)
Bhimashankar Temple : महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप
भीमाशंकर मंदीरातील सभामंडप आणि पायरी मार्गाच्या बांधकामासह भाविकांच्या सुरक्षेच्या कारणास्तव जिल्हाधिकाऱ्यांनी 9 जानेवारी 2026 पासून तीन महिन्यांसाठी भीमाशंकर मंदिर बंद ठेवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे हजारो किलोमीटर पायी व सायकल वारी करून येणाऱ्या भाविकांनाही दर्शन न घेता परत जावे लागत आहे. अशातच हेलिकॉप्टरने आलेल्या खासदार डॉ. निशिकांत दुबे यांना विशेष परवानगी देऊन मंदिरात दर्शन घडवण्यात आल्याने भाविकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. राजकीय नेत्यांसाठी मंदिर खुले आणि सर्वसामान्यांसाठी बंद का, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.महादेवाच्या मंदिरात दुजाभाव का? प्रशासनावर भाविकांचा संताप व्यक्त होत आहे.
Bhimashankar Temple Rituals : नित्य पूजा सुरूच, मात्र थेट दर्शन बंद
मंदिर भाविकांच्या दर्शनासाठी बंद असले तरी श्री भीमाशंकरची नित्य पूजा, अभिषेक आणि धार्मिक विधी परंपरेनुसार नियमितपणे सुरू राहणार आहेत. मात्र या कालावधीत भाविकांना थेट दर्शन (प्रत्यक्ष दर्शन) किंवा मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.
भीमाशंकर मंदिर निर्बंध: प्रवेशावर कडक निर्बंध
बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी आणि भीमाशंकर ग्रामस्थ वगळता अन्य कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही. भाविकांनी या निर्णयाचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात भीमाशंकर
महाराष्ट्रातील पुण्याजवळ सह्याद्री पर्वतावर असलेले भीमाशंकर मंदिर बाराव्या ज्योतिर्लिंगात सहाव्या क्रमांकावर आहे. या शिवधाममध्ये स्थापित शिवलिंगाचा आकार खूप मोठा आणि जाड आहे म्हणून त्याला मोतेश्वर महादेव असेही म्हणतात. धार्मिक मान्यतेनुसार, त्रेतायुगात शिव आणि दैत्य त्रिपुरासूर यांच्यातील युद्धात इतकी उष्णता निर्माण झाली की, भीमा नदी कोरडी पडली नंतर शंकरजींच्या घामाने ही नदी पुन्हा भरली, असं म्हटलं जातं. महाराष्ट्रात पुण्याजवळ खेड तालुक्यात आहे. सह्याद्री पर्वताच्या घाट भागात असून शिवाजीनगरपासून 127 कि.मी. अंतरावर आहे.
आणखी वाचा
Comments are closed.