राष्ट्रवादीतील मंत्रिपदासाठी आसुसलेले आमदार अजितदादांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करत नाहीत, पट
अजित पवार यांचा विमान अपघात : राज्याचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचा 28 जानेवारी 2026 बारामती येथे विमान अपघातात (Baramati Plane Crash) दुर्दैवी मृत्यू झाला. या अपघातानंतर महाराष्ट्रातील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. या अपघात प्रकरणावरून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. हा अपघात नसून घातपात असू शकतो, असा संशय रोहित पवार यांनी व्यक्त केलाय. तर अजित पवार गटातील नेते या अपघात प्रकरणाच्या चौकशीवरून आक्रमक भूमिका घेताना दिसत नसल्याचे चित्र आहे. आता यावरून शरद पवार गटाचे नेते विकास लवांडे यांनी अजित पवार गटाच्या नेत्यांवर घणाघाती टीका केलीय.
विकास लवांडे म्हणाले की, आदरणीय अजित दादा पवार यांना जाऊन दीड महिना झाला. त्यांचा घात झालेला आहे. तो नियोजित मर्डर झालेला आहे हे अख्खा महाराष्ट्र बोलत आहे. त्यांचे पुतणे रोहित पवार हे सर्व पातळीवर पाठपुरावा करत आहेत. पत्रकार परिषद घेऊन जगासमोर सगळे पुरावे देत आहेत. मुद्द्यांच्या अनुषंगाने तपास व्हावा, पारदर्शक तपास व्हावा म्हणून ते प्रयत्नशील आहेत.
आदरणीय अजितदादांच्या #NCP पक्षाचे आमदार अजितदादांना न्याय मिळावा यासाठी का प्रयत्न करत नाहीत? आपल्याला मंत्रिपद मिळावे यासाठी ते त्यांच्या प्रमुख नेत्यांना खुश करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याची खंत वाटते. युवा आमदार @RRPSpeaks यांची भूमिका त्यांना का खटकते? pic.twitter.com/owhE4t3jwS
— विकास लवांडे (@VikasLawande1) १५ मार्च २०२६
Ajit Pawar Death Plane Crash: काही नेते पटेल-तटकरेंचं लांगुलचालन करतायत
तर दुसऱ्या बाजूला भारतीय जनता पार्टीचे लोक अस्वस्थ होत आहेत. त्यांना अजितदादांना न्याय मिळावा असे अजिबात वाटत नाही. अजितदादांच्या पक्षाचे अमोल मिटकरी सोडले तर काही आमदारांना मंत्रीपदाची स्वप्न पडत आहेत, पदाची स्वप्न पडत आहेत. मंत्रीपदासाठी आसुसलेले आमदार सुनील शेळके, आमदार अनिल पाटील व अन्य काही आमदारांना मंत्री व्हायचे आहे आणि म्हणून सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल या नेत्यांचे लांगुलचालन करण्यासाठी व त्यांना खुश करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. त्यांना अजितदादांना न्याय मिळावा, असे अजिबात वाटत नाही ही खंत आहे, अशी टीका त्यांनी केली आहे.
Ajit Pawar Death Plane Crash: अजितदादांना न्याय न मिळाल्यास शासन व्यवस्था जबाबदार
विकास लवांडे पुढे म्हणाले की, अजितदादांच्या पक्षात राहून त्यांच्या पक्षाने आपल्याला काहीतरी दिले आहे आणि आपण त्यांना न्याय मिळवण्यासाठी काहीही करणार नाही. उलट जे प्रयत्न करत आहेत, त्यांची तुम्हाला अडचण होत आहे याबाबत नवल वाटत आहे. अजितदादांना न्याय मिळाला पाहिजे, जर त्यांना न्याय मिळाला नाही तर महाराष्ट्रात असा संदेश जाईल की कितीही मोठा माणूस कसाही मारला तरी त्याचे काहीही होणार नाही. असे अनेक मर्डर या इतिहासात पचवलेले आहे तसाच हा देखील मर्डर पचवला जाईल. सामान्य माणसाला कधीच न्याय मिळणार नाही. सामान्य माणसाने आता पेटून उठले पाहिजे, तरच न्याय मिळेल. अजितदादांना न्याय न मिळाल्यास शासन व्यवस्था त्यास जबाबदार राहील. हे क्रूर राजकारण त्यास जबाबदार राहील. अजितदादांच्या पक्षातल्या आमदारांनी रोहित पवार यांच्या सुरात सुर मिसळला पाहिजे. रोहितदादांना साथ दिली पाहिजे. तरच अजितदादांना न्याय मिळण्यासाठी ताकद एकत्र येईल. अन्यथा तुम्ही फक्त सत्तेचे लालची आहात हेच सिद्ध होईल, असेदेखील त्यांनी म्हटले.
आणखी वाचा
पुण्यात पुन्हा ‘वैष्णवी’ने संपवलं जीवन; सासरच्या जाचाला कंटाळून 8 महिन्यांतच विवाहितेचं टोकाचं पाऊल
आणखी वाचा
Comments are closed.