बारामती विधानसभेसाठी पोटनिवडणूक जाहीर; बिनविरोध होणार, कोण जिंकणार?, बारामतीकरांनी सांगून टाकलं

Baramati By Election 2026: दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या निधनानं रिक्त झालेल्या बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक (Baramati By Election 2026) जाहीर झाली आहे. केंद्रीय निवडणूक आयोगानं बारामती आणि राहुरी विधानसभा निवडणुकीसाठी पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. 23 एप्रिलला मतदान होणार असून  4 मे रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे.

बारामती विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणूक जाहीर झालेली आहे. मात्र ही निवडणूक बिनविरोध होईल असं बारामतीतल्या काही लोकांना वाटत आहे. बारामतीमध्ये पवारांनी विकास केलेला आहे. त्यामुळे ही निवडणूक बिनविरोध होईल, असे देखील काही लोकांचं म्हणणं आहे. तर ही निवडणूक बिनविरोध होणार नाही, असं काही लोकांचं म्हणणं आहे. बारामतीकरांना काय वाटतं, याबाबत एबीपी माझाने जाणून घेतलं आहे. (Ajit Pawar Baramati By Election 2026)

बारामतीकर काय म्हणाले? (Baramati By Election 2026)

बारामती विधानसभेची पोटनिवडणूक जाहीर झाली आहे. काय वाटतंय, निवडणूक बिनविरोध होईल का?, असा प्रश्न एका बारामतीकराला विचारण्यात आला. यावर हो, बिनविरोध निवडणूक होईल आणि सुनेत्रा पवार जिंकतील, असं ते म्हणाले. दुसऱ्या बारामतीकराला विचारल्यावर, निवडणूक बिनविरोध होईल, अशी एकंदरीत हवा दिसतेय. अजितदादांबद्दल सहानभुती आहे. तसेच समोरुन कुणी उमेदवार दिले तरीही एकतर्फी निवडणूक होईल, असं मत नोंदवलं. सुनेत्रा पवारांसमोर कुणी उमेदवार देणार नाही, असं मतही काही बारामतीकरांनी नोंदवलं आहे. तर काहींनी बारामतीची पोटनिवडणूक बिनविरोध होणार नाही, असंही म्हटलं आहे. त्यामुळे आगामी दिवसांत बारामतीमध्ये नेमकं काय घडणार, हे स्पष्ट होणार आहे.

शरद पवार गट बारामती विधानसभेची पोटनिवडणुक लढणार नाही- (Sharad Pawar On Baramati By Election 2026)

बारामती विधानसभेची पोटनिवडणुक राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष लढणार नाही, अशी सूत्रांची माहिती आहे. पक्षांतर्गत बैठकीत निवडणूक न लढण्याचा निर्णय झाल्याचं सांगण्यात येत आहे. मागील विधानसभा निवडणुकीत अजित पवार यांच्यात विरोधात युगेंद्र पवार यांनी बारामती विधानसभा निवडणूक लढली होती. अजित पवार यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर उमेदवार न देण्याची राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची भूमिका आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून सुनेत्रा पवार विधानसभेच्या उमेदवार असणार आहेत.

अजित पवारांचा विमान अपघातामध्ये मृत्यू- (Ajit Pawar Plane Crash)

अजित पवार (Ajit Pawar Plane Crash) यांचं विमान अपघातामध्ये निधन झालं. 28 जानेवारीला अजित पवार खाजगी विमानाने सकाळी मुंबईहून बारामतीकडे रवाना झाले होते. यावेळी बारामती विमानतळावर लँडिंगदरम्यान विमानाचा अपघात झाला होता. यामध्ये अजित पवारांसह 5 जणांचा मृत्यू झाला. अजित पवारांच्या अकाली मृत्यूमुळे राज्याच्या सर्वच स्तरात दुःखाची लाट उसळली. (Ajit Pawar Death) लाखो चाहते, समर्थक, सर्वपक्षीय नेते यांच्या उपस्थितीत 29 जानेवारीला अजित पवारांवर बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानच्या मैदानात अंत्यसंस्कार करण्यात आले.

बारामती विधानसभा पोटनिवडणूक कार्यक्रम- (Baramati Assembly By-election)

  1. निवडणुकीची अधिसूचना जारी :  30 मार्च 2026
  2. उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत : 6 एप्रिल 2026
  3. अर्जांची छाननी : 7 एप्रिल 2026
  4. अर्ज मागे घेण्याची मुदत : 9 एप्रिल 2026
  5. मतदानाची तारीख : 23 एप्रिल 2026
  6. मतमोजणी : 4 मे 2026
  7. निवडणूक प्रक्रिया पूर्ण करण्याची तारीख : 6 मे 2026

संबंधित बातमी:

Supriya Sule On Baramati By Election 2026: बारामतीत एकीकीडे बिनविरोधची चर्चा, दुसरीकडे लक्ष्मण हाकेंचं नाव पुढे; शरद पवारही उमेदवार देणार?, सुप्रिया सुळे म्हणाल्या…

आणखी वाचा

Comments are closed.