रक्तबंबाळ अवस्थेत रुग्णालयात, डॉक्टरांकडून तातडीची शस्त्रक्रिया, तारकेश्वर गडाच्या महंत अदिनाथ

आदिनाथ महाराज अहिल्यानगर गुन्हा: अहिल्यानगरच्या तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री (Aadinath Maharaj Shastri) यांनी रविवारी स्वत:ला इजा करुन घेतल्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यामुळे त्यांना गुरुस्थानी मानणाऱ्या भक्त संप्रदायात चिंतेचे वातावरण होते. या पार्श्वभूमीवर आता त्यांच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांकडून एक महत्त्वपूर्ण माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra Crime news)

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्रींची तब्येत स्थिर असल्याचे डॉ. हर्षवर्धन तनवर यांनी सांगितले आहे. महाराजांवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून लवकरच ते बरे होतील अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. त्यामुळे  महाराजांच्या भक्तांनी त्यांना भेटायला येऊ नये. जेणेकरुन त्यांना कोणत्याही प्रकारचे इन्फेक्शन होणार नाही, असं आवाहन डॉक्टर हर्षवर्धन तनवर आवाहन केले आहे. काही दिवस त्यांना हॉस्पिटलमध्ये ठेवावे लागेल. त्यानंतर डिस्चार्ज दिला जाईल अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे.

याशिवाय, तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांचा रुग्णालयातील एक प्रतिक्रिया समोर आली असून माझी प्रकृती स्थिर आहे. मी लवकरच गडावर येईल, असे शास्त्री महाराजांनी म्हटले आहे. मात्र, त्यांनी हे कृत्य का केले, याबाबत माहिती देण्यास मात्र नकार दिला आहे. मला भेटण्यासाठी कोणीही रुग्णालयात येऊ नये, असे आवाहनही त्यांनी केले. दरम्यान जनतेच्या आशीर्वादाने माझी तब्येत बरी असल्याचे महाराजांनी म्हटले आहे.

Ahilyanagar News: तारकेश्वर गडावर नेमकं काय घडलं होतं?

तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री हे रविवारी संध्याकाळी आपल्या भक्तांसोबत होते. संध्याकाळी साडेपाच वाजता भक्तांना सोडून ते आपल्या खोलीत निघून आले. यानंतर त्यांनी खोलीत स्वत:च्या अंगावर वार करुन घेतले. नंतर त्यांच्या खोलीत कोणीतरी गेल्यावर त्यांना ते जखमी अवस्थेत आढळून आले. यानंतर आदिनाथ महाराज शास्त्री यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तारकेश्वर गडाचे महंत आदिनाथ महाराज शास्त्री यांना मानणारा मोठा भक्त परिवार अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यात आणि बीड जिल्ह्यात आहे. आदिनाथ महाराज यांनी हे पाऊल उचलल्यानं त्यांच्या पाथर्डी आणि बीड जिल्ह्यातील भक्त परिवारात मोठी खळबळ उडाली होती.

आणखी वाचा

गुप्तधनाच्या नावाने खणलेल्या खड्ड्यात प्राध्यापकाला पुरलं, ‘क्राइम पेट्रोल’च्या स्टोरीलाही लाजवेल असा प्लॅन रचला पण अखेर पोलिसांच्या ताब्यात सापडलेत, छत्रपती संभाजीनगरमध्ये नक्की काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.