मुलुंड स्टेशनवर पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले; मृत्युपूर्वी काही तास आधी महिलेची पोलिसां
मुंबई क्राईम न्यूज मुंबई : मुंबईत एका व्यक्तीने कौटुंबिक वादातून आपल्या पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केल्याची धक्कादायक घटना (Mumbai Crime News) समोर आली असून, त्याला सुरतमधून अटक करण्यात आली आहे. आरोपी राजुकुमार गुप्ता (Rajukumar Gupta) हा इलेक्ट्रिशियन असून, 14 मार्च रोजी सकाळी त्याने आपल्या 36 वर्षीय पत्नी पुष्पा हिला लोकलसमोर (Mumbai Local) ढकलले. या घटनेनंतर तो आपल्या धाकट्या मुलासह फरार झाला होता. विशेष म्हणजे, घटनेच्या काही तास आधीच मृत महिलेने पोलिसांत तक्रारही दाखल केली होती.
नेमकं काय घडलं? (Mumbai Crime News)
मृत महिलेचा भाऊ कमलेश कुमार गुप्ता (30), जो सैन्यात कार्यरत आहे, याने दिलेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये सतत वाद होत होते. त्यामुळे तो आपल्या बहिणीला आणि तिच्या 15 वर्षीय मुलाला उत्तर प्रदेशातील मूळ गावी घेऊन जाण्यासाठी आला होता. 14 मार्च रोजी पुन्हा दोघांमध्ये वाद झाल्यानंतर पुष्पा पोलिसांकडे गेली. त्यानंतर कमलेश, पुष्पा आणि तिचा मुलगा मुलुंड स्थानकावर पोहोचले. मात्र, कमलेशला आपले आर्मी आयडी कार्ड घरी राहिल्याचे लक्षात आले. तो आणि त्याचा पुतण्या ते आणण्यासाठी परत गेले असता, संतप्त राजुकुमारने त्यांना घरात कोंडून ठेवले. यानंतर आरोपी मुलुंड स्थानकावर पोहोचला. प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभी असलेल्या आपल्या पत्नीला त्याने धावत्या लोकलसमोर ढकलले आणि तेथून पळ काढला, अशी माहिती एफआयआरमध्ये नमूद आहे.
आरोपी राजुकुमार गुप्ताविरुद्ध गुन्हा दाखल- (Mumbai Crime News)
घटनेनंतर प्रवाशांनी स्टेशन मास्टरला माहिती दिली. रेल्वे अधिकाऱ्यांनी तातडीने पुष्पाला शासकीय रुग्णालयात नेले, मात्र डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. दरम्यान, कमलेशने शेजाऱ्यांच्या मदतीने स्वतःची सुटका करून घेतली. पोलिसांनी सांगितले की, संपूर्ण घटना स्थानकावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. कुर्ला जीआरपीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे आरोपी राजुकुमार गुप्ता याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम 103 (खून केल्याबद्दल शिक्षा) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राज्यासह देश-विदेशातील महत्वाच्या घडामोडी, Video:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.