दुचाकीची ओला कॅबला धडक लागल्याने उफाळला वाद, चालक अन् प्रवाशाने तरुणाला रस्त्यावरच संपवलं; मुंब

मुंबई क्राईम न्यूज: मुंबईतील (Mumbai) बांगूर नगर परिसरात एका किरकोळ रस्ते अपघातातून सुरू झालेला वाद थेट हत्या प्रकरणात परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत 27 वर्षीय शरीफ अन्सारी यांचा मृत्यू झाला असून, पोलिसांनी (Mumbai Police) अल्पावधीत दोन आरोपींना अटक केली आहे. (Mumbai Crime News)

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, शरीफ अन्सारी हे मालवणी बॅक रोडवरून गोरेगावकडे दुचाकीवरून जात होते. यावेळी त्यांच्या दुचाकीची ओला कॅबला किरकोळ धडक लागली. या छोट्याशा अपघातानंतर दोन्ही बाजूंमध्ये वाद सुरू झाला. रागाच्या भरात अन्सारी यांनी हेल्मेटने कॅबवर मारहाण केल्याचा आरोप आहे. यानंतर हा वाद चिघळत जाऊन हाणामारीत परिवर्तित झाला.

Mumbai Crime News हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर

या भांडणादरम्यान ओला कॅब चालक सत्येंद्र गुप्ता (28) आणि त्याच्या गाडीत असलेला प्रवासी सुनील पाल (27) यांनी अन्सारी यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप आहे. या हल्ल्यात धारदार शस्त्राचा वापर करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. गंभीर जखमी अवस्थेत अन्सारी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

Mumbai Crime News: दोन्ही आरोपींना गोरेगाव परिसरातून अटक

घटनेनंतर पोलिसांनी तत्काळ हालचाल करत वरिष्ठ पोलीस निरीक्षक रविंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला. दोन विशेष पथके तयार करून काही तासांतच दोन्ही आरोपींना गोरेगाव परिसरातून अटक करण्यात आली. दरम्यान, आरोपी सत्येंद्र गुप्ता हा मनसेशी संबंधित असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे, तर दुसरा आरोपी सुनील पाल हा वॉटर पंप मेकॅनिक म्हणून काम करतो. या प्रकरणात वापरण्यात आलेले धारदार शस्त्र आरोपींकडे कसे आले, तसेच या घटनेत आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा सखोल तपास पोलिसांकडून सुरू आहे.

Mumbai Crime News: पतीने पत्नीला धावत्या लोकलसमोर ढकलले, मुलुंड स्टेशनवरील घटना

मुंबईत कौटुंबिक वादातून अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. राजुकुमार गुप्ता (इलेक्ट्रिशियन) याने 14 मार्च रोजी सकाळी मुलुंड स्थानकावर आपल्या 36 वर्षीय पत्नी पुष्पा हिला धावत्या लोकलसमोर ढकलून ठार केले. घटनेनंतर तो धाकट्या मुलासह फरार झाला होता. मिळालेल्या माहितीनुसार, पती-पत्नीमध्ये सतत वाद सुरू होते. घटनेच्या दिवशीही वाद झाल्यानंतर पुष्पा पोलिसांकडे तक्रार देऊन मुलुंड स्टेशनवर आली होती. याच दरम्यान आरोपी तेथे पोहोचून प्लॅटफॉर्मवरून तिला धावत्या ट्रेनसमोर ढकलून पळून गेला. संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे. जखमी अवस्थेत रुग्णालयात नेल्यानंतर डॉक्टरांनी पुष्पाला मृत घोषित केले. कुर्ला जीआरपीने आरोपीविरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून, त्याला सुरतमधून अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.

आणखी वाचा

Nashik Tapovan: नाशिकमध्ये धक्कादायक प्रकार, तपोवनातील झाडांवर झाडांवर फोटो, बिब्बे अन् खिळे ठोकून जादूटोणा; पर्यावरणप्रेमी संतप्त

आणखी वाचा

Comments are closed.