खळबळजनक! उद्या पेपर आणि आज दहावीच्या भूगोलाच्या प्रश्नपत्रिकांची चोरी; सांगोल्यात परीक्षा केंद्

सांगोला : राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावीच्या परीक्षेदरम्यान सांगोला शहरातून एक अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील परीक्षा केंद्राची ‘स्ट्राँग रूम’ (SSC Exam Paper 2026) फोडून भूगोलाच्या तब्बल ५० प्रश्नपत्रिकांचा गठ्ठा चोरीला गेल्याने शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. उद्या होणाऱ्या पेपरपूर्वीच ही चोरी झाल्याने प्रशासनामध्ये खळबळ उडाली आहे.(SSC Exam Paper 2026)

सध्या सर्वत्र पेपर फुटी आणि कॉफीचे प्रकार समोर येत असताना सांगोल्यात थेट स्ट्रॉंग रूम तोडून उद्या होणाऱ्या भूगोलाचे 50 पेपर चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. आज सकाळी शिक्षण विभाग आणि कस्तोडियन हे कालचे उरलेले पेपर बोर्डाकडे पोस्टात टाकण्यासाठी आले असता स्ट्रॉंग रूमचे कुलूप तोडल्याचे दिसून आले. सांगोला शहरातील सांगोला विद्यामंदिर येथे बोर्ड परीक्षेचे सर्व पेपर ठेवण्याचे स्ट्रॉंग रूम असून या स्ट्रॉंग रूम मधून ही चोरी झाली आहे. आज सकाळी साडेआठ वाजता या स्ट्रॉंग रूम जवळ अधिकारी पोचल्यावर कुलूप कापल्याचे दिसून आले. मात्र यापुढची समजलेली धक्कादायक माहिती नुसार या स्ट्रॉंग रूम समोरील सीसीटीव्ही सध्या बंद असल्याने चोरट्यांचे कोणतेही फुटेज मिळू शकलेले नाही. या ठिकाणी बंदोबस्ताला असलेला कर्मचारी देखील ही घटना  होताना कुठे होता असा प्रश्न निर्माण झाला आहे.  मात्र थेट बोर्डाच्या पेपर ठेवलेले स्ट्रॉंग रूम फोडून प्रश्नपत्रिकाची चोरी होणे हा अतिशय धक्कादायक प्रकार आहे. या घटनेनंतर सोलापूरचे सहाय्यक पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावलकर, डी वाय एस पी बसवराज शिवपुजे आणि पोलीस निरीक्षक घटनास्थळी पोचले आहेत. सध्या पोलीस या संपूर्ण प्रकाराची चौकशी करीत असून पेपरचे गठ्ठे शोधण्याचे काम सुरू झालेले आहे. उद्या दहावीचा भूगोलाचा पेपर चोरीला गेल्याने उद्याच्या परीक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. मात्र या प्रकारात जबाबदार असणाऱ्यांवर तातडीने कारवाई करण्याची मागणी ही होऊ लागली आहे.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, उद्या (१८ मार्च) दहावीचा भूगोलाचा पेपर होणार आहे. या परीक्षेसाठी आवश्यक असलेल्या प्रश्नपत्रिका सांगोला विद्यामंदिर प्रशालेतील स्ट्राँग रूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आल्या होत्या. मात्र, अज्ञातांनी रात्रीच्या सुमारास या स्ट्राँग रूमचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि भूगोलाच्या ५० प्रश्नपत्रिकांचा संच चोरून नेला.(SSC Exam Paper 2026)

सकाळी जेव्हा केंद्रावरील कर्मचाऱ्यांच्या ही बाब लक्षात आली, तेव्हा एकच धावपळ उडाली. स्ट्राँग रूमसारख्या अत्यंत सुरक्षित मानल्या जाणाऱ्या ठिकाणचे कुलूप तोडले गेल्याने सुरक्षिततेवर मोठे प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. दहावीच्या बोर्डाच्या प्रश्नपत्रिका चोरीला गेल्याने हा पेपर रद्द होणार की नवीन प्रश्नपत्रिका पुरवल्या जाणार, याबाबत शिक्षण मंडळाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान, घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.(SSC Exam Paper 2026)

पालक आणि विद्यार्थ्यांमध्ये चिंतेचे वातावरण

उद्या पेपर असतानाच अशा प्रकारची घटना घडल्याने विद्यार्थी आणि पालकांमध्ये भीतीचे आणि संभ्रमाचे वातावरण आहे. परीक्षेच्या गोपनीयतेचा प्रश्न ऐरणीवर आल्याने शिक्षण विभागाच्या कारभारावरही टीका होत आहे.

आणखी वाचा

Comments are closed.