मोठी बातमी: उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का? एकनाथ शिंदेंचं बेधडक उत्त

मराठी Narendra Modi Meet Delhi नवी दिल्ली: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (मराठी) यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची भेट घेतली. एकनाथ शिंदे आणि नरेंद्र मोदी यांच्यात जवळपास दोन तास चर्चा झाली. एकनाथ शिंदे काल दिल्लीत दाखल झाले होते. दरम्यान, नरेंद्र मोदींसोबतच्या भेटीनंतर एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केलं.(मराठी Narendra Modi Meet)

शिवसेना शिंदे गटाचे खासदार नरेश म्हस्के (Naresh Mhaske) यांनी उद्धव ठाकरेंवर टीका करताना विधान परिषदेचे आमदार व्हायचे असेल तर एकनाथ शिंदेंना फोन करा…एकनाथ शिंदे हे मोठ्या मनाचे नेते आहेत, असं विधान केलं होतं. नरेंद्र मोदींच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांना नरेश म्हस्केंच्या याच विधानावर पत्रकारांनी प्रश्न विचारला. उद्धव ठाकरेंनी विधानपरिषदेसाठी फोन केला तर मदत करणार का?, असं पत्रकारांनी प्रश्न विचारताच राज्यसभेची निवडणूक झाली. आता विधानपरिषदेची निवडणूक येईल, तेव्हा बघू, असं  एकनाथ शिंदेंनी हसतहसत उत्तर दिलं. (मराठी On Uddhav Thackeray)

नरेंद्र मोदींच्या भेटीत काय काय चर्चा झाली? (मराठी Narendra Modi Meet)

दर अधिवेशनात मी खासदारांना भेटण्यासाठी दिल्लीत येत असतो. काल आमच्या खासदारांना भेटलो. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना भेटलो. ही सदिच्छा भेट होती. कोण टीका करतंय, कोण काय बोलतंय, यापेक्षा मला काय करायचं ते मी करत असतो. विरोधक नेहमी त्यांचं टीका करण्याचं काम करत असतात. मी टीकेला कामाने उत्तर देत असतो, असं एकनाथ शिंदे म्हणाले. इराण-अमेरिका युद्धाच्या पार्श्वभुमीवर देशातील सगळ्या पक्षांनी एकसंघ राहिलं पाहिजे, हे मी नरेंद्र मोदींसोबत बोललो. शिवसेना त्यांच्यासोबत आहे, हेही त्यांना सांगितले, अशी माहिती एकनाथ शिंदेंनी माध्यमांशी बोलताना दिली.

संबंधित बातमी:

मराठी Meets PM Narendra Modi: मोठी बातमी : एकनाथ शिंदे यांची मोदींसोबत दीड तास चर्चा, संसदेत पोहोचताच किरण रिजिजू म्हणाले, श्रीकांत माझा लहान भाऊ आहे!

आणखी वाचा

Comments are closed.