काल-परवा माझ्या मित्राची मुलगी अशाच मुलाबरोबर कलकत्त्याला पळून गेली; धर्म स्वातंत्र्य विधेयकावर

महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य कायदा 2026: महाराष्ट्र धर्मस्वातंत्र्य विधेयक (Maharashtra Freedom Of Religion Act 2026) विधान परिषदेत (Vidhan Parishad) मांडण्यात आले. मंत्री पंकज भोयर (Pankaj Bhoyar) यांनी हे विधेयक सभागृहात मांडले. यानंतर शिवसेना आमदार हेमंत पाटील यांनी एक गंभीर आरोप केला. काल-परवा माझ्या मित्राची मुलगी एका मुलाबरोबर कलकत्त्याला पळून गेली, असे त्यांनी म्हटले. यामुळे सभागृहात एकच खळबळ उडाली.

Hemant Patil: हेमंत पाटील यांचा दावा

विधान परिषदेत बोलताना आमदार हेमंत पाटील यांनी गंभीर आरोप करत वैयक्तिक अनुभव सांगितला. नांदेडमध्ये लाखो मुले शिकायला येतात. याठिकाणी 15, 16 वर्षाच्या मुलींच्या मागे मुस्लिम मुलांचे टोळके फिरत असल्याचं चित्र आहे. काल परवा माझ्या मित्राची मुलगी अशाच मुलाबरोबर कलकत्त्याला पळून गेली. हे गंभीर आहे. हे लोकं जास्त संख्येने मुलं जन्माला घालतात, याचा मतांवर परिणाम होतो. माझी मागणी आहे की, एक व्यक्ती एक मूल असायला हवे. आपण नियम करायला हवा. ए. आर. अंतुले देखील सांगायचे की, आमचे मूळ नाव कदम होते. आपल्या येथे कन्वर्टेड मुस्लिम आहेत, जे मूळचे वेगळे आहेत. जादूटोणा वशीकरण हे कायद्यात असणे गरजेचे आहे. कारण परवा एका मुलीला पळवून नेलं, त्यावेळी तिच्यावर अंगारा फुंकण्यात आला होता, असा आरोप त्यांनी केला.

Anil Parab: मी बिलाला समर्थन करणार, पण… : अनिल परब

यानंतर अनिल परब म्हणाले की, मी बिलाला समर्थन करणार आहे. मात्र, त्यातील काही बाबींचा उलगडा होणे गरजेचे आहे. हे बिल पक्षांतर बिल आहे की धर्मांतर बिल आहे? कारण पक्षांतर्गत बिलामध्ये ज्या बाबी समाविष्ट होत्या, त्या सगळ्या बाबी या बिलामधे समाविष्ट आहेत. फसवू नये, लाडीगोडी दाखवून पळवू नेणे, आमिष दाखवणे, दिशाभूल करणे या सगळ्या गोष्टी नमूद आहेत. महाराष्ट्रामध्ये किती भागात कुठल्या समाजात आणि काय कारणाने धर्मांतर होते, त्याची माहिती द्यावी. माझी माहिती आहे की, गरिबीचा आधार घेऊन समाजात घुसून धर्मांतर केलं जातं. मग या सगळ्या गोष्टी देण्याची जबाबदारी सरकारची आहे, असे त्यांनी म्हटले.

Anil Parab: धर्मांतर करायला कोणीही अडवू शकत नाही : अनिल परब

अनिल परब पुढे म्हणाले की, जर सरकार अपयशी ठरत असेल तर अशा लोकांना या समाजात घुसायला आणि धर्मांतर करायला वाव मिळतो. प्रमाण जर वाढलं आहे तर सरकारची कामगिरी कमी झाली आहे का? अशी काय गोष्ट झाली की धर्मांतराला स्कोप मिळाला. धर्मांतर करायला कोणीही अडवू शकत नाही, असे देखील त्यांनी म्हटले.

आणखी वाचा

साहेब, इकडे या… भरत गोगावलेंचा आवाज; उद्धव ठाकरे म्हणाले, नको, इथेच बरंय; रश्मी ठाकरेही बघत बसल्या, VIDEO

आणखी वाचा

Comments are closed.