महिलेचं लैंगिक शोषण करणाऱ्या अशोक खरातला अटक; अंधारेंचा चाकणकरांवर निशाणा, म्हणाल्या, लिंगपिसाट
अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमधील बहुचर्चित अशोक खरात उर्फ कॅप्टन (Ashok Kharat) या भोंदूगिरी करणाऱ्या मांत्रिकाला क्राइम ब्रांच युनिट एकने अटक केली आहे. या भोंदूबाबाला आज नाशिक जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. या मांत्रिकाने गुंगीचे औषध देऊन एका महिलेवर बलात्कार केल्याप्रकरणी नाशिकच्या सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. महत्त्वाची बाब म्हणजे या भोंदूबाबाकडे अनेक राजकीय नेते, अधिकारी, सेलिब्रिटी आपले भविष्य जाणून घेण्यासाठी जात होते. त्यांचे व्हिडीओही पोलीस तपासात उघडकीस आले आहेत. त्यामुळे राज्यात एकच खळबळ उडाली आहे. (Nashik Ashok Kharat Baba News)
सिन्नर तालुक्यात अशोक खरात याने श्री शिवनिका संस्थान या मंदिराची स्थापना केली आहे. या मंदिराच्या विश्वस्त पदावर महिला आयोगाच्या अध्यक्ष रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) आहेत, तर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना त्यांनीही या मंदिरात जाऊन दर्शन घेतले होते, तेव्हापासून अशोक खरात जास्त चर्चेत आला होता. आता पोलीस तपासत आणखी काय माहिती समोर येते, रूपाली चाकणकर काय भूमिका घेतात याकडे लक्ष लागलं आहे. दरम्यान अंधश्रद्धा निर्ममुल समितीने या प्रकरणात उडी घेऊन कठोर शिक्षा करण्याची मागणी केली आहे. दरम्यान, या सगळ्या प्रकरणावर आता शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली असं म्हणत निशाणा साधला आहे. (Ashok Kharat Nashik Crime News)
सुषमा अंधारे काय म्हणाल्या? (Sushama Andhare On Rupali Chakankar)
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली. खरात याच्यावर बलात्कार यासारखे आरोप आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती समोर येत आहे. हे उल्लेखनीय आहे की या स्वयंघोषित ज्योतिषाकडे अनेक राजकीय नेत्यांचा राबता होता. केसरकर तटकरे चाकणकर अशी काही राजकीय भक्तांची नावे…नेक राजकीय नेत्यांनी या ज्योतिषाच्या सांगण्यावर वेगवेगळ्या पूजा करणे, स्वतःच्या हाताची करंगळी कापून घेणे असे अघोरी उद्योग सुद्धा केल्याचे लोक चर्चा करत आहेत. विशेष यापूर्वी सुद्धा अशोक खरात याच्यावर जेव्हा लैंगिक शोषणाचे आरोप एका संस्थेने केले तेव्हा चाकणकर यांनी आपल्या पदाचा दुरुपयोग करत संबंधित संस्थेकडून दबाव आणून माफीनामा घेतला होता, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
विशेष खरात यांनी स्थापन केलेल्या संस्थेवर रूपाली चाकणकर संचालक म्हणून काम करतात. खरात याच्या घरच्या लग्न कार्यामध्ये चाकणकर जातीने आवभगत करताना बघून अनेकांना आश्चर्य वाटले होते. आता आम्हाला शंका नव्हे भीती आहे, पुन्हा एकदा महिला आयोगासारख्या अत्यंत जबाबदार पदाचा दुरुपयोग करत रूपाली चाकणकर यांनी अशा लिंगपिसाट माणसाला मदत केली तर याची जबाबदारी कोण घेणार ? कारण अशा भामट्या ज्योतिष्यासाठी स्वतः छत्री घेऊन चाकणकर उभ्या आहेत. योगायोगाने राज्याच्या उपमुख्यमंत्री पदावर याच पक्षाच्या नेत्या सुनेत्रा वहिनी विराजित आहेत. महिला म्हणून सुनेत्रा वहिनींच्या मनाला तरी ही गोष्ट पटते का? की अशा लिंग पिसाट माणसाला पाठीशी घालणाऱ्या चाकणकरांना या पदावर ठेवावे…?, असा सवालही सुषमा अंधारे यांनी उपस्थित केला आहे. (Nashik Ashok Kharat Baba News)
रूपाली चाकणकरांच्या छत्रछायेखाली…..
कॅप्टन अशोक खरात नावाच्या स्वयंघोषित ज्योतिषाला आज नाशिक पोलिसांनी अटक केली खरात याच्यावर बलात्कार योन शोषण यासारखे आरोप आहेत.
पोलिसांनी हस्तगत केलेल्या पेन ड्राईव्ह मधून 58 आक्षेपार्ह व्हिडिओ पोलिसांनी हस्तगत केल्याची माहिती… pic.twitter.com/kQNGznfsos— सुषमाताई अंधारे (@andharesushama) 18 मार्च 2026
कोण आहे अशोक खरात उर्फ ‘ स्वघोषित कॅप्टन’? (Nashik Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो प्रसिद्ध अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. नोव्हेंबर २०२२ मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मिरगाव येथील मंदिरात भेट दिल्यानंतर अशोक खरात चर्चेत आला होता. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शन घेण्यासाठी जात असतात. त्याचं खरं रुप समोर आल्यामुळे मोठी खळबळ उडाली आहे. कॅप्टन अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये २२ वर्षांच्या कारकिर्दीत खरातने १५४ देशांचे दौरे पूर्ण केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याचे मानले जाते. खरातने आपले लक्ष ‘कॉस्मॉलॉजी’ (विश्वशास्त्र) नावाच्या विज्ञानशाखेच्या अभ्यासाकडे वळवले, तेव्हा त्याच्या आयुष्याला रंजक वळण मिळालं. कॉस्मॉलॉजीने गेल्या १०० वर्षांत प्रचंड प्रगती साधली आहे. आइन्स्टाईन यांच्या १९१७ मधील विश्वाच्या ‘स्थिर प्रतिमाना’द्वारे (static model) सैद्धांतिक भौतिकशास्त्राची एक शाखा म्हणून याची सुरुवात झाली; आणि सुरुवातीच्या काळात, विशेषतः लेमैत्र (Lemaître) यांच्या कार्यामुळे या शाखेचा विकास झाला.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.