मोठी बातमी: अशोक खरात अतिशय घाणेरडा, जे कुणी त्याच्यासोबत…; प्रफुल पटेल यांचं मोठं विधान
Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case: नाशिकमध्ये बलात्कार प्रकरणात नाशिक पोलिसांनी अशोक खरात (Ashok Kharat) या ज्योतिषाला अटक केली असून राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांच्यासोबतचे अशोक खरातचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या घटनेनंतर राज्यातील विविध नेत्यांनी रुपाली चाकणकर यांच्यावर टीका केली आहे. या प्रकरणी रुपाली चाकणकर यांचा राजीनामा घेण्याची मागणी जोर धरत आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते प्रफुल पटेल (Praful Patel) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. (Praful Patel On Rupali Chakankar Ashok Kharat Case)
अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे- (Praful Patel On Ashok Kharat Case)
भोंदूबाबाचे जे काही प्रकार आहेत ते अतिशय वाईट आहे आणि घाणेरडा आहे. अशोक खरातवर सक्त कारवाई केली पाहिजे, आणि जे लोक त्यांच्यासोबत आहेत, त्यांच्यावर सुद्धा सक्तीने कारवाई केली पाहिजे, त्याचप्रमाणे काही राजकीय नेत्यांचे नाव जोडले गेले आहेत. त्यावर आम्ही राष्ट्रवादी म्हणून योग्य कार्यवाही करणार आणि ते येणाऱ्या काळात दिसेल, अशी प्रतिक्रिया प्रफुल पटेल यांनी दिली.
रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारताच सुनील तटकरे संतापले- (Sunil Tatkare On Rupali Chakankar)
महाडमधील एका कार्यक्रमाला सुनील तटकरे यांनी उपस्थिती लावली होती. या कार्यक्रमानंतर माध्यमांशी सुनील तटकरेंना अशोक खरात प्रकरणावरुन रुपाली चाकणकरांबाबत प्रश्न विचारला. यावर सुनील तटकरे चांगलेच संतापल्याचे दिसून आले. ही जागा बोलायची नाही. मी योग्यवेळी बोलेन. मला घटनेने आधिकार दिला आहे, मला ज्यावेळी बोलायचं आहे, त्यावेळी बोलेन, असं सांगत सुनील तटकरे निघून गेले. (Sunil Tatkare On Ashok Kharat Case)
रुपाली चाकणकरांचे अशोक खरातसोबत अनेक फोटो- (Rupali Chakankar-Ashok Kharat )
राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रूपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांनी अशोक खरातच्या पाद्यपूजेचा व्हिडीओ समोर आला. तसेच अशोक खरात आणि रुपाली चाकणकर (Ashok Kharat And Rupali Chakankar) यांचे विविध कार्यक्रमातील फोटोही समोर आल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. रुपाली चाकणकरांविरोधात आज शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली पाटील-ठोंबरे, सामाजित कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे.
NEMK केस घेते? (नाशिक अशोक खरात प्रकरण)
अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार (Rape news) केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
कोण आहे अशोक खरात? (Who Is Ashok Kharat)
नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.