अशोक खरातचे बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात, कॅप्टनचे आणखी कांड उजेडात येणार?
नाशिक : भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणी मोठी अपडेट समोर आली आहे. खरातचं बिंग फोडणारा नीरज जाधव पोलिसांच्या ताब्यात आला आहे. नीरज जाधव विरोधात शिर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला आता नाशिकच्या क्राईम ब्रँच पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. नीरज जाधवनेच कॅप्टन खरातच्या केबिनमधील सीसीटीव्ही फुटेज बाहेर आणल्याचा संशय आहे.
पीडित मुलीला तिचे मॉर्फ केलेल्या व्हिडीओचे स्क्रीनशॉट्स पाठविल्या प्रकरणी नीरज जाधव विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक खरात प्रकरणात गेल्या दोन दिवसांपासून नीरज जाधवची चौकशी केली जात होती. अशोक खरात प्रकरणात अजून काही माहिती नीरज जाधव याच्याकडून मिळते का यासाठी पोलीस प्रयत्नशील होते. अशोक खरातला अटक केल्यानंतर त्याचे धागे नीरज जाधवपर्यंत पोहोचले होते. त्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली.
Ashok Kharat Videos : खरातचे 100 हून अधिक व्हिडीओ
कॅप्टन खरातचे महिलांवरील अत्याचाराचे 100 हून अधिक व्हिडीओ असल्याची माहिती आहे. शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. या व्हिडीओतून तांत्रिक विधीच्या नावाखाली महिलांचे लैंगिक शोषण केलं जात असल्याची माहिती समोर आली आहे. आता नीरज जाधवला ताब्यात घेतल्यानंतर अशोक जाधवचे आणखी काय कांड समोर येतात हे पाहावं लागेल.
Ashok Kharat SIT Investigation : एसआयटीकडून तपासाला वेग
कॅप्टन खरात प्रकरणात राज्य सरकारने तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली एसआयटी नेमली आहे. त्यामध्ये नाशिक शहर आणि ग्रामीण पोलिसातील 12 हून अधिक पोलीस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. पोलिसांना खरातच्या घरच्या झाडाझडतीत 2 लॅपटॉप, 8 लाखांची रोकड, पिस्तुल, जीवंत काडतुसे आणि मालमत्तांची कागदपत्रे मिळाली आहे. शिर्डी प्रकरणातील आरोपी नीरज जाधवने हे व्हिडीओ काढल्याचा संशय आहे. कॅप्टन खरात प्रकरणात दाखल 3 गुन्ह्यांचा वेगाने तपास एसआयटीकडून सुरू आहे.
ही बातमी वाचा:
आणखी वाचा
Comments are closed.