Wait and Watch, आणखी काही गोष्टी बाहेर पडतील, चाकणकरांनी राजीनामा देताच रोहिणी खडसेंचा इशारा
रुपाली चाकणकर यांच्यावर रोहिणी खडसे : शेकडो महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या नाशिकचहा भोंदूबाबा अशोक खरटमुले रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) चांगल्याच अडचणीत आल्या आहेत. अशोक खरातसोबत व्हायरल झालेल्या फोटो आणि व्हिडीओमुळे चाकणकरांना राजीनामा द्यायची वेळ आली आहे. या प्रकरणात दबाव वाढल्यानंतर रुपाली चाकणकर यांनी महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांच्याकडे त्यांनी राजीनामा सादर केला. या प्रकरणावर आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch… असा इशाराही यावेळी रोहिणी खडसे यांनी दिला. तसेच ज्या शिडीने वर गेले त्याच शिडीने खाली ! शेवटी… कर्म असेही खडसे म्हणाल्या.
गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल… म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल !
माझी मा.मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) 20 मार्च 2026
नेमकं काय म्हणाल्या रोहिणी खडसे?
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे आपला राजीनामा सोपवला आहे. त्यावर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. म्हणून जास्त उडायचं नसतं ! आता सगळा अहंकार धुळीस मिळेल असं त्या म्हणाल्या. चाकणकर यांच्या राजीनाम्याची बातमी येताच रोहिणी खडसे यांनी सोशल मीडिया हँडलवर एक पोस्ट लिहिली त्यात त्या म्हणाल्या की, गर्वाचे घर नेहमीच खाली असते हे आता काही लोकांना कळलं असेल मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना उद्देशून त्या म्हणाल्या की, माझी मा. मुख्यमंत्री महोदय, मा. सुनेत्रा वहिनी यांना विनंती आहे की त्यांनी फक्त राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षांचा राजीनामा घेऊ नये तर या प्रकरणात जे जे लोक सामील आहेत त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई व्हायला हवी याची खबरदारी घ्यावी. ज्या गोष्टी या प्रकरणात समोर येत आहेत त्या अत्यंत गंभीर आहेत. आणखी काही गोष्टी बाहेर पडतील ! Wait and Watch…असा इशारा देखील रोहिणी खडसे यांनी दिला आहे.
Rupali Chakankar Photo : अशोक खरातसोबत व्हिडीओ, फोटो व्हायरल
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचा अशोक खरातसोबतचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. त्यामध्ये रुपाली चाकणकर या अशोक खरातची पाद्यपूजा करताना दिसत आहेत. तर दुसऱ्या एका व्हिडीओमध्ये चाकणकर या अशोक खरातला थेट विठ्ठलाची उपमा देताना दिसत आहेत. सोबतच चाकणकर आणि अशोक खरात यांचे काही फोटोही व्हायरल झाले.
रुपाली चाकणकर या अशोक खरातने स्थापन केलेल्या ट्रस्टच्या संचालिका आहेत. गेल्या वर्षी एका महिलेच्या लैंगिक छळ प्रकरणी रुपाली चाकणकरांनी त्या महिलेला मदत करण्याऐवजी अशोक खरातला मदत केल्याचं समोर आलं. त्यामुळे अशोक खरातवर चाकणकरांचा राजकीय वरदहस्त असल्याची चर्चा सुरू झाली. रुपाली चाकणकरांनी या प्रकरणात राजीनामा द्यावा अशी मागणी करण्यात आली.
Rupali Chakankar Resignation : मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर निर्णय
शेकडो महिलांच्या लैंगिक छळाचा आरोप असलेल्या अशोक खरातचे रोज नवनवीन कांड समोर येत आहेत. गुंगीचं औषध प्यायला लावून, त्यांना संमोहित करून खरातने अनेक महिलांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. त्याचे दोन व्हिडीओही समोर आले आहे. अशोक खरातचे असे 100 हून जास्त व्हिडीओ, दोन लॅपटॉप पोलिसांच्या हाती लागले आहेत.
महत्वाच्या बातम्या:
Rupali Chakankar : भोंदूबाबाच्या नादी लागल्याने दोन्ही पदं गमावली; रुपाली चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा, राष्ट्रवादीच्या प्रदेशाध्यक्षपदाचाही राजीनामा देणार
आणखी वाचा
Comments are closed.