अशोक खरात प्रकरणात रुपाली चाकणकरांनंतर आणखी एक नेता पोलिसांच्या रडारवर, दीपक केसरकरांच्या निकटव

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने आता गंभीर आणि व्यापक वळण घेतले असून, या प्रकरणाचे पडसाद थेट राज्याच्या राजकारणात उमटताना दिसत आहेत. महिलांच्या लैंगिक शोषणाच्या गंभीर आरोपांमुळे अटकेत असलेल्या अशोक खरातला न्यायालयाने 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, तपास यंत्रणांनी चौकशीची व्याप्ती वाढवली आहे.

नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात याच्याशी संबंध असल्यामुळे रुपाली चाकणकर यांना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा द्यावा लागला आहे. विरोधकांच्या तीव्र दबावानंतर त्यांनी देवेंद्र फडणवीस आणि सुनेत्रा पवार यांची भेट घेत पदाचा राजीनामा दिला.

Ashok Kharat Nashik Crime News: दीपक केसरकरांच्या निकटवर्तीयाची एसआयटीकडून कसून चौकशी

यानंतर तपासात नव्या घडामोडी समोर येत असून, दीपक केसरकर यांचे निकटवर्तीय दीपक लोंढे यांची विशेष तपास पथक (SIT) कडून कसून चौकशी करण्यात आली  आहे. लोंढे आणि अशोक खरात यांच्यात काही ठिकाणी व्यावसायिक संबंध असल्याचा संशय तपास यंत्रणांना आहे. विशेषतः सिन्नर परिसरात जमीन खरेदी-विक्रीच्या व्यवहारांत लोंढे सक्रिय असल्याची माहिती पुढे आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: पोलीस खरातच्या राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहचणार

SIT पथकाने दीपक लोंढे यांची सखोल चौकशी करत विविध आर्थिक आणि व्यावसायिक व्यवहारांची माहिती गोळा केली आहे. या चौकशीतून मिळणाऱ्या धागेदोऱ्यांच्या आधारे पोलिस अशोक खरातच्या संभाव्य राजकीय आणि व्यावसायिक भागीदारांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरातवार ठाकरे सरकारचा सभ्यपणा

दरम्यान, या प्रकरणाशी संबंधित आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे. मिरगाव येथील श्री शिवनिका संस्थान, ज्याचा अध्यक्ष अशोक खरात होता, या संस्थेसाठी दारणा धरणातून 0.0039 दश लक्ष घनमीटर पाणी आरक्षित करण्यात आले होते. 31 जुलै 2020 रोजीचा हा शासन निर्णय असून, गोदावरी उजवा तट कालव्यातून पाणीपुरवठ्यास मंजुरी देण्यात आली होती. हा निर्णय ठाकरे सरकारच्या काळात घेतल्याची माहिती आहे. त्यामुळे अशोक खरात याचा मंत्रालयातील अधिकारी आणि महाविकास आघाडी सरकारमध्येही दबदबा होता का? असा सवाल उपस्थित होत आहे.

अशोक खरात प्रकरण : NEMK ने घेतली केस?

अशोक खरात याच्याविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. नाशिकमध्ये सरकारवाडा पोलिसांत हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. अशोक खरात याने एका 35 वर्षीय महिलेवर गुंगीचे औषध देऊन बलात्कार  केल्याच्या आरोपाखाली त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. बुधवार 18 मार्च रोजी खरात याला पहाटे तीन वाजताच्या सुमारास गुन्हे शाखेकडून ताब्यात घेण्यात आले. अशोक खरात हा सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष आहे. तो मर्चंट नेव्हीतून निवृत्त झाला आहे. गेल्या काही वर्षांमध्ये कॉस्मॉलॉजी एक्स्पर्ट आणि अंकशास्त्रज्ञ म्हणून तो नावारुपाला आला. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक त्याच्याकडे मार्गदर्शनासाठी जातात. मात्र, त्याला बलात्काराच्या आरोपाखाली अटक करण्यात आल्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

Who Is Ashok Kharat : कोण आहे अशोक खरात?

नाशिकमधील सिन्नर तालुक्यात मिरगाव येथील श्री ईशान्येश्वर मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष असलेला कॅप्टन अशोक खरात हा सेवानिवृत्त आहे. तो अंकशास्त्रज्ञ म्हणून ओळखला जातो. अशोक खरात हा मर्चंट नेव्हीमधील निवृत्त अधिकारी आहे. ‘शिवनिका ट्रस्ट’च्या संकेतस्थळावरील माहितीनुसार, मर्चंट नेव्हीमध्ये 22 वर्षांच्या कारकिर्दीत खरातने 154 देशांचे दौरे केले आहेत. त्यामुळे त्या देशांमधील बहुतांश धार्मिक चालीरीती, परंपरा, संस्कृती, नैतिकता आणि नैसर्गिक परिस्थिती यांचा त्याने सखोल अभ्यास केला असल्याची शक्यता आहे. अनेक बडे राजकीय नेते, सेलिब्रिटी आणि उद्योजक भविष्य जाणून घेण्यासाठी तसेच उज्ज्वल भविष्याकरिता करायचे उपाय आदीच्या निमित्ताने अशोक खरातच्या संपर्कात असतात.

आणखी वाचा

Ashok Kharat Nashik Crime News: अशोक खरात डँबिस, शिंग आणून पूजा करायचा, आमच्या लोकांवर पिस्तुल रोखले; अंनिसचा खळबळजनक दावा

आणखी वाचा

Comments are closed.