अंकशास्त्राप्रमाणे बांधलं मंदिर, मुंबईपासून दिल्लीपर्यंत देणग्यांचा ‘प्रसाद’, रविवारच्या दरबारा

अशोक खरात: नाशिकच्या सिन्नर (Sinnar) तालुक्यातील स्वयंघोषित अंकशास्त्रज्ञ अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गंभीर लैंगिक अत्याचाराचे गुन्हे दाखल झाल्यानंतर त्याच्या कार्यपद्धतीचे अनेक पैलू एकामागोमाग उघड होत आहेत. धार्मिक आस्था, अंकशास्त्र आणि दैवी शक्तींचा आव आणत त्याने उभारलेले ‘ईशान्येश्वर’ मंदिर आणि त्यामागील आर्थिक व सामाजिक जाळे आता चर्चेचा केंद्रबिंदू ठरत आहे.

न्यायालयाने खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, तपास सुरू असतानाच सिन्नरमध्ये गेल्या काही दिवसांपासून या प्रकरणाची जोरदार चर्चा रंगली आहे. मंदिर, ज्योतिष आणि अध्यात्माच्या आड असे काही गंभीर प्रकार घडत असतील, यावर स्थानिकांना सुरुवातीला विश्वास बसत नव्हता. मात्र, उघड होत असलेल्या माहितीमुळे संपूर्ण परिसर हादरला आहे.

Ashok Kharat: अंकशास्त्रानुसार ‘ईशान्येश्वर’ मंदिराची उभारणी

मिरगाव येथे नदीच्या ईशान्य दिशेला अंकशास्त्रानुसार ‘ईशान्येश्वर’ मंदिराची उभारणी करण्यात आली होती. या मंदिरासाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत देणग्यांचा ओघ सुरू होता. मंदिराच्या बांधकामासाठी विशेषतः नेवासा येथून दगड मागवण्यात आला होता, तर पायापासून कळसापर्यंत एकाच कारागिराने संपूर्ण मंदिर उभारल्याची माहिती समोर येते. 2010 साली मंदिर पूर्णत्वास गेले.

अशोक खरात : …मंदिराच्या आवारात पूर्णाणे गजबजून

मंदिर उभारणीच्या काळात स्थानिकांसह काही सहकाऱ्यांनीही स्वतःचे काम समजून दिवस-रात्र या प्रकल्पात सहभाग घेतला. याच काळात सिन्नर शहराबाहेर शिर्डी मार्गावर खरातच्या मालकीच्या जागेवर हार्डवेअरचे मोठे दुकान सुरू झाले. दुकानाबाहेर पश्चिमेला असलेल्या छोट्याशा कार्यालयात खरात अधूनमधून बसू लागला आणि तिथूनच त्याचा ‘दरबार’ सुरू झाला. हळूहळू भक्तांची वर्दळ वाढत गेली आणि मंदिर परिसर पूर्णपणे गजबजून गेला.

Ashok Kharat: रविवारी दरबारात व्हीआयपींची गर्दी

मंदिराच्या उद्घाटनानंतर भाविकांची गर्दी प्रचंड वाढली. प्रश्न विचारण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढल्याने मंदिराजवळ ट्रस्टचे दोन मजली कार्यालय उभारण्यात आले. दर रविवारी येथे खरातचा दरबार भरू लागला. या दरबारात राजकारणी, व्यावसायिक तसेच वरिष्ठ प्रशासकीय अधिकारी, आयएएस, आयपीएस दर्जाचे अधिकारीही उपस्थित राहत असल्याच्या चर्चा रंगू लागल्या. अनेक व्हीआयपी मंडळी तासन्तास खरातची भेट घेण्यासाठी प्रतीक्षा करत असत.

Ashok Kharat: वाढत्या प्रभावातून ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात निधी

या वाढत्या प्रभावातून ट्रस्टकडे मोठ्या प्रमाणात निधी जमा होत गेला. मंदिरासमोरील पाच एकर जागेवर वेधशाळा, गोशाळा आणि युवकांसाठी अभ्यासिका उभारण्याचे स्वप्न खरातने रंगवले होते. या प्रकल्पांसाठीही राजकीय वर्तुळातून निधी मिळाल्याची चर्चा आहे. मंदिराकडे जाण्यासाठी शिर्डी रस्त्यावर आकर्षक प्रवेशद्वार उभारण्यात आले, तसेच मंदिरापर्यंत डांबरी रस्ता तयार करण्यात आला.

Ashok Kharat: आणखी धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता

मंदिर परिसरात पेव्हर ब्लॉक, प्रशस्त सभागृह उभारण्यात आले होते. विशेषतः श्रावण महिन्यात भाविकांमध्ये ‘महाप्रसाद’ देण्यासाठी स्पर्धा लागत असे. खरातचा आशीर्वाद मिळावा, या हेतूने हजारो भाविक आधीच खर्च देण्यासाठी नोंदणी करत असत. त्याचा वाढदिवस, गुरुपौर्णिमा यांसारखे कार्यक्रम मोठ्या दिमाखात साजरे केले जात. दरम्यान, आज समोर येत असलेल्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर या संपूर्ण व्यवस्थेवर आणि निधीच्या स्रोतांवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. धार्मिक श्रद्धा आणि अंकशास्त्राच्या आड उभारलेले हे जाळे नेमके किती खोलवर रुजले होते, याचा तपास आता यंत्रणा करत असून, येत्या काळात आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता आहे.

आणखी वाचा

Ashok Kharat: नाशिक पोलिसांनी ‘प्रसाद’ देताच अशोक खरात म्हणाला, ‘तुम्ही घोर अपराध केलाय, तुमच्यावर कोप होईल’; नेमकं काय घडलं?

आणखी वाचा

Comments are closed.