अशोक खरातकडे फार मोठी मंडळी यायची, रुपाली चाकणकरांना तिथे कोणीतरी…; छगन भुजबळ नेमकं काय म्हणा

अशोक खरात आणि रुपाली चाकणकर यांच्यावर छगन भुजबळ : नाशिकच्या सिन्नर तालुक्यातील अंकशास्त्रज्ञ आणि स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर बलात्काराचे गंभीर गुन्हे दाखल झाल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू झाली आहे. न्यायालयाने अशोक खरातला 24 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. अशोक खरातवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. तर राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर (Rupali Chakankar) यांचे खरात सोबतचे फोटो आणि त्याची पाद्यपूजा करतानाचा व्हिडिओ समोर आला होते. त्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात येत होती. अखेर रुपाली चाकणकर यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. आता राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी या प्रकरणावर आपली प्रतिक्रिया दिली आहे.

Chhagan Bhujbal on Ashok Kharat and Rupali Chakankar: माझे लोक देखील सांगत होते तिकडे जाऊ, पण…

छगन भुजबळ म्हणाले की, मी बातम्यातून देखील वाचतोय. मला काही त्यांच्या बाबत फार माहिती नाही. माझे लोक देखील सांगत होते की, तिकडे जाऊ. पण, मी काही गेलो नाही. अंधश्रद्धेपासून दूर राहिले पाहिजे, हे माझं मत आहे. काही चांगले साधू देखील आहेत. ते चांगले काम करत आहेत. अशोक खरातकडे फार मोठी मंडळी येत होती. रुपाली चाकणकर पुण्याच्या आहे, त्यांना काय माहित? त्यांना सुद्धा तिकडे कोणीतरी नेलं असेल. पण राजकीय क्षेत्रात काम करणाऱ्यांनी काही बंधने पाळले पाहिजेत. पोलीस याबाबत देखील चौकशी करत आहेत, कारवाई होईल. चाकणकर नेहमी तिथे जात असल्यामुळे त्यांना विश्वस्त केले असेल, असे त्यांनी म्हटले.

Chhagan Bhujbal on Rupali Chakankar: चाकणकरांच्या राजीनाम्याबाबत भुजबळांची प्रतिक्रिया

छगन भुजबळ पुढे म्हणाले की, संविधानिक पदाबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी निर्णय घेतला. मात्र पक्षाच्या अध्यक्ष पदाबाबत पक्षाचे वरिष्ठ नेते आणि अध्यक्ष सुनेत्रा पवार निर्णय घेतील. संपूर्ण चौकशी करून त्यावर निर्णय होतो, असे देखील त्यांनी यावेळी सांगितले. तर ज्यांच्यावर अन्याय झाला असेल ते पुढे येतील. जे अधिकारी नेमले आहेत ते चौकशी करून कारवाई करतील, असे देखील छगन भुजबळ म्हणाले.

आणखी वाचा

Ashok Kharat: अशोक खरातवर ठाकरे सरकारचीही मेहेरबानी, शिवनिका संस्थानला शेतकऱ्यांच्या हक्काचं पाणी दिलं, कॅप्टन खरातचा मविआ काळातही दबदबा?

आणखी वाचा

Comments are closed.