प्रिय पार्थ, अजितदादांकडून आलेला वारसा..; पार्थ पवारांच्या वाढदिवसानिमित्य सुनिल तटकरेंची पोस्ट

पार्थ पवारांवर सुनील तटकरे : अजित पवारांचे सुपुत्र आणि राष्ट्रवादीचे खासदार पार्थ पवार यांचा आज वाढदिवस (पार्थ पवार वाढदिवस) आहे. त्यानिमित्य राज्यभरातून त्यांना शुभेच्छा देण्यात येत आहे. अशातच राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी देखील एक भावनिक पोस्ट करत पार्थ पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहे. ‘प्रिय पार्थ, यंदा एका वेगळ्याच परिस्थितीत आपण सारेच जण सापडलो आहोत. अजितदादा (Ajit Pawar) आपल्यात नसतानाचा हा तुझा पहिला वाढदिवस. अशा परिस्थितीत शुभेच्छा देताना मनात असंख्य आठवणी दाटून येतात.

अजितदादांचा (Ajit Pawar) कार्यकर्तृत्वाचा डोंगर फार मोठा होता. तो डोंगर पार करून तू त्या पलीकडे जात कर्तृत्वाची उंची गाठाविस, अजितदादांकडून आलेला वारसा जपत सर्वसामान्य जनतेसाठी झिजावेस आणि तुझ्या कामातून तुझी वेगळी ओळख निर्माण करावीस यासाठी अनेक शुभेच्छा आणि आशीर्वाद! अशा शब्दात सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी पार्थ पवारांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. (पार्थ पवार वाढदिवसानिमित्त सुनील तटकरे)

Parth Pawar : सर्वांना नम्र आवाहन… बॅनर्स, जाहिराती, घरात किंवा कार्यालयामध्ये….

दरम्यान, पार्थ पवार (पार्थ पवार) यांनी आपल्या वाढदिवसाच्या एक दिवसाआधी सामाजिक मीडियावर एक पोस्ट केली होती. त्यात ते म्हणाले होते ते‘लोकनेते आदरणीय अजितदादा पवार यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन… आदरणीय दादांनी आयुष्यभर शिस्त, समर्पण आणि विकासाचा ध्यास घेत महाराष्ट्राची सेवा केली. त्यांच्या कार्यातून आपणाला निष्ठा, कर्तव्यभावना आणि जनतेप्रती असलेली बांधिलकी यांचे मोल शिकायला मिळाले. आज त्यांच्या स्मृती जपत असताना, त्यांच्याप्रती असलेला आदर अधिक सुसंगत आणि एकसंधपणे व्यक्त व्हावा, यासाठी सर्वांना नम्र आवाहन… बॅनर्स, जाहिराती, घरात किंवा कार्यालयामध्ये लावण्यासाठी आदरणीय दादांचा एकच अधिकृत फोटो वापरावा. हीच एकसंधता, हीच शिस्त आणि हीच भावना दादांना खरी आदरांजली ठरेल…चला, त्यांच्या विचारांना कृतीत उतरवूया, त्यांच्या कार्याचा वारसा जपूया आणि महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी एकदिलाने पुढे जाऊया…’ अशा शब्दात पार्थ पवारांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

Comments are closed.