महिला आयोग अध्यक्षपदासाठी भाजप आग्रही; राष्ट्रवादीला बदल्यात काय मिळणार, रुपाली चाकणकरांनंतर को

मुंबई : नाशिकमधील महिला अत्याचार आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदू Ashok Kharatchya (अशोक खरात) अटकेनंतर त्याच्या शिष्य असलेल्या रुपाली चाकणकर यांचाही राजीनामा घेण्यात आला आहे. राज्य महिला आयोग पदावरुन रुपाली चाकणकर पायउतार झाल्या असून आता राष्ट्रवादीकडून महिला आयोगाचे अध्यक्षपदी काढून घेण्याचा प्रयत्न भाजपकडून (BJP) सुरू असल्याची माहिती आहे. भाजपने महिला आयोगाचे अध्यक्षपद आता आपल्याकडे ठेवण्यासाठी आग्रह धरला असून बदल्यात राष्ट्रवादी (राष्ट्रवादी) काँग्रेसला महामंडळ देण्यात येणार असल्याचे समजते.

महिला आयोग पदावरून राष्ट्रवादी आणि भाजपात रस्सीखेच सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. महिला आयोग पद महायुतीत राष्ट्रवादीच्या वाट्याला असल्यामुळे ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाच मिळावे अशी राष्ट्रवादीची भूमिका आहे. तर, राष्ट्रवादीच्या वाट्याला असणारे महिला आयोग पद स्वतःकडे घेऊन त्या बदल्यात महिला आर्थिक विकास महामंडळ देऊ असा प्रस्ताव भाजपकडून देण्यात येत असल्याचे समजते. त्यामुळे, रुपाली चाकणकर यांच्या राजीनाम्यानंतर महिला आयोगाचे अध्यक्षपद राष्ट्रवादीकडे राहणार की भाजपला मिळणार याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

राजीनाम्यावरुन राष्ट्रवादीत दोन गट

रुपाली चाकणकर यांच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाच्या राजीनाम्याबाबत राष्ट्रवादीत दोन गट पडले असून एका गटाने तात्काळ राजीनामा मंजूर करण्याची भूमिका घेतली आहे. एका गटाकडून चाकणकर यांचा राजीनामा तत्काळ घेण्याची मागणी होत असून राजीनामा झाल्यास सध्या पक्षाची होणारी बदनामी थांबेल अशी भूमिका आहे. तर, दुसऱ्या गटाकडून केवळ फोटो आले म्हणून राजीनामा नको अशी भूमिका घेण्यात येत आहे. सुनेत्रा पवार यांनी मात्र अद्याप महिला प्रदेशाध्यक्ष पदाबाबत निर्णय घेतला नसल्याची विश्वसनीय सूत्रांची माहिती आहे.

एसआयटीकडून तपासाचा तिसरा दिवस

महिला लैंगिक अत्याचार आणि बलात्कार प्रकरणातील आरोपी भोंदू अशोक खरातची आज तिसऱ्या दिवशी एसआटीकडून चौकशी करण्यात येत आहे. तब्बल पाच तासांपासून विशेष तपास पथकाकडून त्याची चौकशी सुरू असून पीडित महिलांकडून पोलिसांकडे आलेल्या तक्रारीनंतर लैंगिक अत्याचारसह इतर मुद्यांवर विशेष तपास पथकाच्या प्रमुख तेजस्विनी सातपुते स्वत: खरातची चौकशी करत आहेत. पोलिसांकडून अशोक खरातचे कार्यालय तसेच इतर कागदपत्रे तपासणी करत सबळ पुरावे गोळा करण्यात येत असून महिलांना भोंदू अशोक खरात कशा पद्धतीने जाळ्यात अडकवत होता याचा सखोल तपास केला जातोय.

हेही वाचा

Ashok Kharat: अशोक खरातचं भरभरुन कौतुक, युरोपच्या पोलिसांचं उदाहरण; व्हायरल व्हिडिओवर पोपटराव पवारांचं स्पष्टीकरण

कोल्हापूर ज्योतिबा मंदिरात पुजाऱ्यांकडून भाविकांना मारहाण, 30 जणांवर गुन्हा; ग्रामस्थांकडून निषेध फेरी

आणखी वाचा

Comments are closed.