लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हाद
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटी या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरात नाशिकच्या मीरपूर येथील ईशानेश्वर मंदिराच्या मागील बाजूस असलेल्या घनदाट जंगलात भक्तांना पूजेसाठी बोलावायचा. त्या ठिकाणी भक्तांना घाबरवून आणि अघोरी कृत्ये करुन खरात त्यांच्याकडून पैसे वसूल करायचा, अशीही माहिती समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरात स्वतः महिलांचे लैंगिक शोषण करतच होता. पण अशोक खरात त्याच्याकडे येणाऱ्या महिला-पुरुषांच्याही लैंगिक संबंधांसाठी जोड्या जुळवत होता. याआधारे अशोक खरातने काही बड्या लोकांना ब्लॅकमेल केले असल्याची माहितीही पोलीस सूत्रांकडे आहे. अशोक खरात पहिले महिलांचे लैंगिक शोषण करुन नंतर यातील पीडित व इतर काही महिलांचाही धनिक पुरुषांसोबत लैंगिक संबंध ठेवण्यासाठी वापर करत होता, अशी हादरवणारी माहितीही समोर आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरात मराठी आजचा न्याय- (अशोक खरात मराठी बातम्या)
अशोक खरात याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून काल 3 महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटी ने दिली आहे. तक्रार करणाऱ्या तिन्ही महिला असून अशोक खरातने त्यांच्यावरही अत्याचार केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर तक्रारी प्रमाणेच पँटर्न राबवित कुटूंबियांना केबिन च्या बाहेर काढून महिलांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल असून यात 5 महिलांनी आणि एका पुरुषाने फिर्याद दिली आहे, आतापर्यंत च्या तपासात काय निष्पन्न झाले याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली जाणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.
अशोक खरातची शिर्डीतही कोट्यावधींची मालमत्ता- (Ashok kharat Case)
भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याची शिर्डीत कोट्यावधींची मालमत्ता असल्याचं समोर आल्यानंतर आता त्याची काही उद्योग व्यवसायातही भागीदारी असल्याचं आता समोर आलं आहे. शिर्डीतील वॉटरपार्क शेजारी निमगाव शिवारात असणाऱ्या कोट्यावधीच्या मालमत्तेत हा भोंदूबाबा भागीदार आहे. 48 गुंठे परीसरात असणाऱ्या सिल्वर ओक या लॉन्समध्ये तो भागीदार आहे. शिवनिका ट्रस्टचे उपाध्यक्ष जितेंद्र शेळके यांचे बंधू महेंद्र शेळके यांच्या लॉन्समध्ये गुंतवणूक या भोंदूबाबाने केली आहे. शिर्डीत अनेक मालमत्ता असल्याची चर्चा असून या मालमत्ता त्याने कशा मिळवल्या याचीही चौकशी होणं गरजेचं आहे.
अशोक खरात आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध उघडकीस- (Ashok kharat Case Nashik Crime News)
भोंदूबाबा अशोक खरात आणि अधिकारी यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशीला सुरवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजीत भोंडे पाटील यांची पत्नी आणि भोंदू बाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटूंबाचे आणि खरात याचे आर्थिक संबंध उघडकीस आणले होते. भोंदूबाबा अशोक खरातसोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक गेल्याची माहिती आहे. आणखी कोण अधिकारी खरात याच्या जागांमध्ये भागीदार आहेत का?, त्याचा देखील तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड झाला आहेत.
अशोक खरातच्या त्या व्हिडिओची कुणकुण कशी लागली?, VIDEO:
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.