I Would Like To Say…अशोक खरात बच्चू कडूंना म्हणाला, तेव्हाच तुम्ही इथे या; व्हिडीओ समोर!

अशोक खरात आणि बच्चू कडू महिलांवर अत्याचार केल्याप्रकरणी स्वयंघोषित ज्योतिषी अशोक खरात (Ashok Kharat) याच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर राज्यात एकच खळबळ उडाली आहे. राज्यातील अनेक मंत्री, बडे अधिकारी, राजकीय नेते, सेलिब्रिटी या भोंदूबाबा अशोक खरातचे भक्त होते. अशोक खरातसोबतचे अनेक राजकीय नेत्यांचे फोटो आणि व्हिडीओही समोर आले. याचदरम्यान, आता माजी मंत्री आणि प्रहार संघटने अध्यक्ष बच्चू कडू (Bacchu Kadu) आणि अशोक खरातचा व्हिडीओही समोर आला आहे. (Bacchu Kadu And Ashok Kharat Video)

अशोक खरात आणि बच्चू कडूंच्या व्हिडीओमध्ये काय? (Bacchu Kadu And Ashok Kharat Video)

बच्चू कडूच्यासोबतच्या व्हिडीओमध्ये अशोक खरात फाडफाड इंग्रजी बोलत आहे. I would like to say, मला तुम्हाला एकच गोष्ट म्हणायची आहे, जेव्हा तुम्ही भाजपमध्ये मंत्री असाल तेव्हा तुम्ही इथे या…असं अशोक खरात बच्चू कडू यांना या व्हिडीओमध्ये बोलताना दिसत आहे. यानंतर ठीक आहे, म्हणत बच्चू कडू अशोक खरातच्या पाया पडत असल्याचं व्हिडीओमधून दिसून येत आहे.

अशोक खरात मराठी आजचा न्याय- (अशोक खरात मराठी बातम्या)

अशोक खरात याला आज नाशिकच्या जिल्हा न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपत असल्यानं त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. अशोक खरात याच्या विरोधात एकूण 6 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आले असून काल 3 महिलांनी गुन्हा दाखल केल्याची माहिती एसआयटी ने दिली आहे. तक्रार करणाऱ्या तिन्ही महिला असून अशोक खरातने त्यांच्यावरही अत्याचार  केल्याची महिलांची तक्रार आहे. इतर तक्रारी प्रमाणेच पँटर्न राबवित कुटूंबियांना केबिन च्या बाहेर काढून महिलांचे शोषण करत असल्याचे समोर आले आहे. आतापर्यंत 6 तक्रारी दाखल असून यात 5 महिलांनी  आणि एका  पुरुषाने फिर्याद दिली आहे, आतापर्यंत च्या तपासात काय निष्पन्न झाले याबाबतीत पोलिसांकडून न्यायालयात माहिती दिली जाणार असून पुढील तपासासाठी पोलीस कोठडीची मागणी केली जाणार आहे.

अशोक खरात आणि अधिकाऱ्यांचे आर्थिक संबंध उघडकीस- (Ashok kharat Case Nashik Crime News)

भोंदूबाबा अशोक खरात आणि अधिकारी यांच्या एकत्रित जागेची आयकर विभागामार्फत चौकशीला सुरवात झाल्याची सूत्रांची माहिती आहे. नाशिकच्या पाथर्डी शिवारात 40 गुंठे जागेत सनदी अधिकारी अभिजीत भोंडे पाटील यांची पत्नी आणि भोंदू बाबा अशोक खरात याची मुलगी यांचा एकत्रित सातबारा समोर आला आहे. काही दिवसांपूर्वीच सामाजिक कार्यकर्त्यांनी अधिकाऱ्यांच्या कुटूंबाचे आणि खरात याचे आर्थिक संबंध उघडकीस आणले होते. भोंदूबाबा अशोक खरातसोबत अनेक सनदी अधिकाऱ्यांनी जागेमध्ये गुंतवणूक गेल्याची माहिती आहे. आणखी कोण अधिकारी खरात याच्या जागांमध्ये भागीदार आहेत का?, त्याचा देखील तपास एसआयटीमार्फत सुरू आहे. भोंदूबाबा अशोक खरात आणि प्रशासनातल्या अधिकाऱ्यांचे लागेबांधे उघड झाला आहेत.

फाडफाड इंग्रजीत सुरुवात, बच्चू कडू-अशोक खरातचा VIDEO:

संबंधित बातमी:

Ashok Kharat Case Nashik Crime News: लैंगिक संबंधांसाठी अशोक खरात जोड्या जुळवायचा; स्वत: लैंगिक शोषण केल्यानंतर काय काय करायचा?, हादरवणारी माहिती

Ashok Kharat Case: पीडित दोन आमदारांना भेटली, व्हिडीओही दाखवले; पण पुढे भयानक घडलं, खरातच्या कारनाम्यांचं बिगं नेमकं कसं फुटलं?

आणखी वाचा

Comments are closed.