चिंचुका, बनावट खडे, नकली साप अन् ‘एल्विश हनी’, भोंदू अशोक खरात भोळ्या भाबड्या लोकांना कसा जाळ्य

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमध्ये समोर आलेल्या भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असून, तपास पुढे सरकत असताना त्याच्या फसवणुकीच्या नव्या पद्धती उघड होत आहेत. स्वतःला ‘कॅप्टन’ म्हणवणाऱ्या अशोक खरातने श्रद्धा, भीती आणि अंधविश्वासाचा आधार घेत भोळ्या-भाबड्या लोकांना जाळ्यात ओढत मोठा आर्थिक आणि लैंगिक शोषणाचा कारभार उभा केल्याचे समोर आले आहे. (Nashik Crime News)

Ashok Kharat Nashik Crime News: चिंचुके आणि बनावट खड्यांचा खेळ

तपासात समोर आलेल्या माहितीनुसार, बाजारात सहज मिळणारे चिंचोके आणि बनावट खडे “दैवी शक्तीचे” असल्याचे सांगून खरात हजारो ते लाखो रुपयांना विकत होता. एका चिंचोक्यासाठी तब्बल एक लाख रुपये उकळल्याच्या घटना समोर आल्या आहेत. भोळ्या भाविकांच्या श्रद्धेचा गैरफायदा घेत तो पैशांची उकळपट्टी करत होता.

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज : बनावट सपने भिंत बांधकाम

नाशिकच्या धार्मिक प्रतिमेचा फायदा घेत खरातने ‘सर्पपूजा’चा प्रकार राबवला. दरबारात तंत्र-मंत्राच्या नावाखाली तो ध्यानस्थ बसत असे आणि काही वेळाने 20 फुटांचा नाग प्रकट झाल्याचा आभास निर्माण केला जात असे. प्रत्यक्षात हा साप बनावट असल्याचा असून, रिमोट किंवा इतर यंत्रणेद्वारे तो हलवला जात असल्याची माहिती तपासात समोर येत आहे. या प्रकारामुळे भाविकांमध्ये प्रचंड भीती निर्माण होत असे आणि त्याचा फायदा घेऊन तो पैसे उकळत असे.

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: 'एल्विश हनी'

फसवणुकीचा आणखी एक धक्कादायक प्रकार म्हणजे “तुर्की मध” किंवा “एल्विश हनी” विक्री. हा मध कामोत्तेजक आणि शक्तिवर्धक असल्याचा दावा करत खरात अनेक उद्योजक आणि राजकीय नेत्यांना विकत होता. विशेष म्हणजे, एका किलो मधाची किंमत तब्बल 9 लाख रुपये ठेवली जात होती. हा मध तुर्कीच्या समुद्रातील खोल गुहांमधून मिळतो, असा खोटा दावा करून लोकांचा विश्वास संपादन केला जात होता.

Ashok Kharat Nashik Crime News: ट्रस्टमार्फत पैशांचा व्यवहार

या माध्यमातून मिळालेली मोठी रक्कम खरात आपल्या ट्रस्टच्या नावावर जमा करत असल्याचेही तपासात उघड झाले आहे. या व्यवहारांद्वारे काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. त्यामुळे आता या आर्थिक व्यवहारांची सखोल चौकशी सुरू आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: दरबारात बड्या व्यक्तींची वर्दळ

दरम्यान, सिन्नरच्या मिरगाव येथे मंदिर उभारून खरातने आपला ‘दरबार’ सुरू केला होता. ज्योतिष, अंकशास्त्र, पूजाविधी यांच्या नावाखाली तो लोकांच्या समस्या सोडवण्याचा दावा करत असे. अपत्यप्राप्ती, वैवाहिक अडचणी, नोकरी, राजकीय भविष्य अशा कारणांनी अनेकजण त्याच्याकडे जात असत. त्यात राजकीय नेते, अधिकारी, उद्योजक आणि कलाकारांचाही समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.

Ashok Kharat Nashik Crime News: भीती आणि विश्वासाच्या आड शोषण

तपासात स्पष्ट झाले आहे की, खरातची मुख्य पद्धत म्हणजे लोकांच्या मनात भीती आणि अंधश्रद्धा निर्माण करणे. एकदा व्यक्ती त्याच्या प्रभावाखाली आली की, विविध बहाण्यांनी महिलांना एकटे बोलावून त्यांचे लैंगिक शोषण केले जात असल्याचे आरोप आहेत. एकूणच, चिंचोके, खडे, नकली साप आणि महागडा मध अशा विविध माध्यमांतून अशोक खरातने फसवणुकीचे जाळे उभे केले होते. आता या प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे, तसतसे आणखी धक्कादायक खुलासे समोर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

आणखी वाचा

Sunil Tatkare on Ashok Kharat: हाताच्या बोटाला जखम कशी झाली, सुनील तटकरेंनी ठणकावून सांगितलं, ‘माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही’

आणखी वाचा

Comments are closed.