आता IPL चा धमाका! स्टेडियममध्ये सामना बघण्यासाठी कसे करायचे Online तिकीट बुकिंग? जाणून घ्या A ट

IPL 2026 तिकीट बुकिंग मराठी बातम्या : आयपीएलच्या 19व्या हंगामाचा थरार 28 मार्चपासून रंगणार आहे. आयपीएल 2026 चा उद्घाटन सामना गतविजेता रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि सनरायझर्स हैदराबाद (RCB VS SRH) यांच्यात होणार असून, पहिल्याच दिवशी चाहत्यांना हाय-व्होल्टेज लढत पाहायला मिळणार आहे. आयपीएल म्हटलं की क्रिकेट चाहत्यांमध्ये जबरदस्त उत्साह असतो. आपल्या आवडत्या संघाचा सामना थेट स्टेडियममध्ये बसून पाहण्याची प्रत्येकाची इच्छा असते. जर तुम्हालाही तुमच्या फेव्हरेट टीमचा सामना LIVE पाहायचा असेल, तर तिकीट बुकिंगबाबतची महत्त्वाची माहिती जाणून घेणं गरजेचं आहे. तिकीट बुकिंग कधी सुरू होणार, कुठे उपलब्ध असणार आणि कोणत्या तारखेपासून विक्री सुरू होईल, याबाबतची संपूर्ण माहिती आम्ही तुम्हाला पुढे देणार आहोत.

तिकीट कुठे आणि कधी बुक कराल?

आयपीएल 2026 चे तिकीट बुकमायशो (BookMyShow), झोमॅटोचे डिस्ट्रिक्ट (District by Zomato) आणि अधिकृत फ्रँचायझी वेबसाईटवरून ऑनलाइन बुक करा. तिकीट बुकिंग 20 मार्च 2026 पासून टप्प्याटप्प्याने सुरू झाली आहे, ज्यासाठी 350-450 रुपयांपासून सुरुवातीची किंमत आहे

IPL 2026 तिकीट बुकिंग प्रक्रिया चरण-दर-चरण

  • प्लॅटफॉर्म निवडा – बुकमायशो किंवा District by Zomato अॅप/वेबसाइट उघडा
  • IPL 2026 शोधा – सर्च बारमध्ये ‘IPL 2026’ किंवा तुमचं शहर (मुंबईचेन्नई) टाका
  • सामना निवडा – तुम्हाला पाहायचा सामना निवडा
  • सीट निवडा – स्टेडियमचा लेआउट पाहून बजेटनुसार सीट सिलेक्ट करा
  • पेमेंट करा – UPI, क्रेडिट/डेबिट कार्ड किंवा नेट बँकिंगद्वारे पेमेंट करून तिकीट कन्फर्म करा

पहिल्या सामन्यासाठी तिकिटे मिळवण्याचा ऑनलाइन बुकिंग हा सोपा मार्ग आहे. पण, ज्या चाहत्यांना काउंटरवरून तिकिटे खरेदी करायची आहेत, त्यांच्यासाठीही आरसीबीने व्यवस्था केली आहे. आरसीबीची तिकिटे केवळ shop.royalchallengers.com वर उपलब्ध आहेत. तुम्हाला तिकिटे ऑनलाइन खरेदी करणे आवश्यक आहे. पण, तिकिटे सध्या वेबसाइटवर उपलब्ध नाहीत आणि तिकिटांची विक्री कधी सुरू होईल हे अस्पष्ट आहे.

हे ही वाचा –

IPL 2026 New Rule : बीसीसीआयने शेवटच्या क्षणी नियम बदलले, IPL फ्रँचायझींचे धाबे दणाणले, कोणते आहे नवे 7 नियम?

आणखी वाचा

Comments are closed.