अशोक खरात प्रकरणात राज्य सरकारकडून बड्या वकिलाची नियुक्ती, कोण आहेत ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर?

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) महिला लैंगिक अत्याचार प्रकरणात आता तपासाला नवे वळण मिळण्याची शक्यता आहे. या संवेदनशील प्रकरणासाठी सरकारकडून ज्येष्ठ विधीज्ञ अजय मिसर (Ajay Misar) यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे.

या नियुक्तीमुळे प्रकरणाची कायदेशीर बाजू अधिक भक्कम करण्याचा सरकारचा प्रयत्न असल्याचे मानले जात आहे. अशोक खरातविरोधातील गंभीर आरोप, वाढती पीडितांची संख्या आणि समाजात निर्माण झालेली संवेदनशीलता लक्षात घेता अनुभवी वकिलाची निवड करण्यात आली आहे.

अशोक खरात नाशिक क्राईम न्यूज : ज्येष्ठ वकील अजय मिसार कुठे आहेत?

अजय मिसर यांना गुंतागुंतीच्या आणि उच्चप्रोफाइल खटल्यांचा मोठा अनुभव आहे. त्यांनी 2008 मधील मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरण, 2011 मधील दादर ऑपेरा हाऊस बॉम्बस्फोट, तसेच आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या रवी पुजारी प्रकरणात सरकारी वकील म्हणून महत्त्वाची भूमिका बजावली आहे. याशिवाय, नाशिकमधील धान्य घोटाळ्यासारख्या आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणांतही त्यांनी प्रभावीपणे बाजू मांडली आहे. दरम्यान, अशोक खरात प्रकरणात विशेष तपास पथक (SIT) सखोल चौकशी करत असून, लैंगिक अत्याचार आणि आर्थिक गैरव्यवहार या दोन्ही बाजूंनी तपास वेगाने सुरू आहे. अजय मिसर यांच्या नियुक्तीमुळे न्यायालयीन प्रक्रियेला गती मिळण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा मिळवून देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Ashok Kharat: अशोक खरातला आज न्यायालयात हजर करणार

दरम्यान, अशोक खरात विरोधात एकूण 6 गुन्हे दाखल झाले असून नव्याने 3 तक्रार दाखल झाल्या आहेत. भोंदू अशोक खरात विरोधात दाखल तक्रारीत एका विद्यार्थिनीचा देखील समावेश आहे. नराधम अशोक खरातने विद्यार्थिनीशी गैरवर्तन केल्याचे उघडकीस आले आहे. धार्मिक विधी, लग्न जमवून देणे, पूजाविधी, भविष्य सांगणे अशा वेगवेगळ्या बहाण्याने अशोक खरातने महिलांवर अत्याचार केलेत. अशोक खरातच्या पोलीस कोठडीची मुदत आज संपणार असून त्याला आज कोर्टात हजर केले जाणार आहे. आज न्यायालयात पोलिसांकडून काय बाजू मांडली जाते आणि पोलीस कोठडीत किती वाढ होते? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

इतर महत्त्वाच्या बातम्या

Ashok Kharat: चिंचुका, बनावट खडे, नकली साप अन् ‘एल्विश हनी’, भोंदू अशोक खरात भोळ्या भाबड्या लोकांना कसा जाळ्यात ओढायचा? हादरवणारी माहिती समोर

Sunil Tatkare on Ashok Kharat: हाताच्या बोटाला जखम कशी झाली, सुनील तटकरेंनी ठणकावून सांगितलं, ‘माझी श्रद्धा आहे, अंधश्रद्धा नाही’

आणखी वाचा

Comments are closed.