IPL 2026 – केवळ अडीच महिने चालणाऱ्या या स्पर्धेने… राजस्थान रॉयल्सच्या विक्रमी विक्रीवर सौरव गांगुली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :













सामनाचे अनुसरण करा

आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स या संघाची सुमारे 1.63 बिलियन डॉलर्स (अंदाजे 15 हजार कोटींहून अधिक) इतक्या विक्रमी किमतीत विक्री झाल्याचे वृत्त समोर आले आहे. BCCI माजी अध्यक्ष सौरव गांगुली यांनी या कराराचे वर्णन ‘थक्क करणारे’ असे केले आहे. अमेरिकन उद्योजक काल सोमानी यांच्या नेतृत्वाखालील कन्सोर्टियमने हा संघ खरेदी केला आहे. ज्यामध्ये वॉलमार्ट आणि फोर्ड कुटुंबातील सदस्यांचाही सहभाग आहे. हा करार आयपीएल 2026 नंतर लागू होण्याची शक्यता असून, क्रिकेटच्या इतिहासातील हे आजवरचे सर्वात मोठे मूल्यांकन मानले जात आहे.

या ऐतिहासिक घडामोडीवर भाष्य करताना गांगुली म्हणाला की, “एका क्रिकेट संघासाठी ही रक्कम खरोखरच अवाढव्य आहे, विशेषतः जेव्हा तो संघ वर्षातून केवळ तीन महिने खेळतो. पण ही हिंदुस्थानी क्रिकेटसाठी खूप मोठी बातमी आहे.” 2008 मधील पहिल्या आयपीएल हंगामाची आठवण करून देताना गांगुलीने सांगितले की, ज्या लीगची सुरुवात आपण केली होती, तिने आज जागतिक स्तरावर हे उत्तुंग यश मिळवले आहे, हे पाहून अत्यंत आनंद होत आहे.

IPL इतिहासातील सर्वात मोठा व्यवहार; राजस्थान रॉयल्सची 15 हजार कोटींहून अधिक किमतीत विक्री, खरेदीदार कोण?

गांगुलीने पुढे आयपीएलच्या आर्थिक ताकदीची तुलना जागतिक फुटबॉल लीगशी केली. तो म्हणाला, “आयपीएलचे प्रक्षेपण हक्क आज जगातील कोणत्याही मोठ्या खेळासारखेच मौल्यवान आहेत. अमेरिकेतील गुंतवणूकदार आता हिंदुस्थानी क्रिकेटमध्ये रस दाखवत आहेत, ही खेळाच्या प्रसारासाठी उत्तम बाब आहे.” केवळ अडीच महिने चालणाऱ्या या स्पर्धेने जगाचे लक्ष वेधून घेणे ही एक अभूतपूर्व घटना असल्याचेही त्यांनी नमूद केले.

Comments are closed.