पटेल आणि तटकरेंचा गेम सुनेत्रा काकींच्या लक्षात आला, म्हणूनच त्यांना बाजूला ठेवला : रोहित पवार
रोहित पवार : पक्षाची सगळे सुत्रे आपल्या हातात घ्यायची हा प्रफुल पटेल आणि सुनील beachcombing खेळ होता, असं वक्तव्य शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी केलं. स्वत: हिरो व्हायच हा त्यांचा खेळ होईल. दिल्लीवाल्यांची एड आणि इतर कारवाई होणार नाही, त्यातून मोकळे व्हावं हा प्रफुल पटेल आणि सुनील beachcombing खेळ होता. मात्र, तो फिस्कलटाला आहे. सुनेत्रा काकींना या सगळ्या गोष्टी कळाल्या असल्याचे रोहित पवार म्हणाले.
सुनेत्रा काकींनी पक्षाचा ताबा स्वत:च्या हातात घेतला ही चांगली गोष्ट
रोहिउत पवार यांनी आज प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आपल्या हातात घेण्याचा प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांचा खेळ फिस्कटला असल्याचे रोहित पवार म्हणाले. सुनेत्रा काकींनी पक्षाचा ताबा स्वत:च्या हातात घेतला ही चांगली गोष्ट असल्याचे रोहित पवार म्हणाले. आमदार आणि कार्यकर्त्यांची काळजी घेतली आणि प्रफुल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासारख्या नेत्यांना बाजूला ठेवले तर पक्षाला कोणती अडचण येईल असे वाटत नसल्याचे रोहित पवार म्हणाले.
महाराष्ट्र सरकारने एफआयआर घेतला नाही, पण कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल
विधिमंडळ अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी आमदार रोहित पवार यांनी सभागृहात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाच्या चौकशीबद्दल प्रश्न उपस्थित केले. अपघात की घातपात यासंदर्भात सुरू असलेल्या चौकशीबाबत सरकार का बोलत नाही, सद्यस्थिती काय आहे. तसेच, महाराष्ट्र सरकारने एफआयआर घेतला नाही, पण कर्नाटक सरकारने गुन्हा दाखल करुन घेतला असेही रोहित पवार यांनी सभागृहात बोलताना आवर्जून सांगितले. त्यानंतर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात भूमिका मांडली असून रोहित पवारांच्या प्रश्नांची उत्तरे दिली. तसेच, अजित दादांचा घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, मुर्दा खोदून काढू असेही ठणकावून सांगितले.
अजित दादांचा घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, खोदून काढू, सोडणार नाही : मुख्यमंत्री
अजित दादांचा अपघात हा जर घातपात असेल तर कोणाचाही बाप असू दे, खोदून काढू, सोडणार नाही असे मुख्यमंत्री म्हणाले. कदाचित तुमच्यापेक्षा माझी तीव्रता कमी असू शकते, पण इतकी बोथट नाही की अजित दादांच्या केसमध्ये कोणी कॉन्स्परिन्सी करेल, तर आम्ही द्याला सोडून देऊ, त्याचा मुदडाही खोदून काढू अशा शब्दात देवेंद्र फडणवीसांनी रोहित पवारांच्या प्रश्नांवर उत्तर देत याप्रकरणी टोकाच तपास करण्याचे ठणकावले.
महत्वाच्या बातम्या:
Video: अजितदादांचा घातपात असेल तर आकाश-पातळ एक करु, कुणाचा बाप असला तरी खोदून काढू, देवेंद्र फडणवीसांचा रोहित पवारांना शब्द
आणखी वाचा
Comments are closed.