मर्सिडीज दिली, 21 देशात फिरवले, फार्म हाऊसवर किचन, फर्निचर बनवून घेतले; अशोक खरातने मृत्यूची भी
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरात (Ashok Kharat) याच्या विरोधात नाशिकच्या सरकारवाडा पोलिसांत 10 वा गुन्हा दाखल झाला आहे. अशोक खरात विरोधात 8 आणि त्याच्याशी निगडीत 2 असे एकूण 10 गुन्हे आता अशोक खरातविरोधात नोंदवण्यात आले आहेत. मृत्यूची भीती दाखवून आर्थिक फसवणूक केल्या प्रकरणी अशोक खरातविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील बांधकाम व्यवसायिक राजेंद्र जासूद यांनी अशोक खरात विरोधात गुन्हा दाखल केला आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
वावी पोलीस ठाण्यात अशोक खरात यानेच राजेंद्र जासूद आणि दिनेश परब विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल केला होता. बनावट व्हिडीओ दाखवून 5 कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा खोटा गुन्हा दाखल करणाऱ्या अशोक खरात विरोधातच खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लॉजेस्टिकचा व्यवसाय करण्यासाठी अवतार पूजा करण्याच्या बहाण्याने फसवणूक केल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
अशोक खरात यांना साप चावण्याची भीती दाखवली- (अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज)
अवतार पूजा करण्यासाठी मर्सिडीज कार घेतली. सन 2018 मध्ये MH 15 GL 8181 या नंबरची मर्सडीज बाबाला भेट दिली. अवतार पूजा करण्याआधी परिसाची शक्ती प्राप्त करण्यासाठी 21 देशांची भ्रमंती करावी लागेल, तसे न केल्यास नागदेवता दंश करेल अशी अशोक खरातने मृत्यूची भीती दाखवली. गुरूच्या सेवेचे कारण सांगून आणि मृत्यूची भीती घालून अमेरिकेत वैद्यकीय खर्च करण्यास भाग पाडले. अमेरिकेत वैद्यकीय उपचारासाठी 29 लाख 81 हजार खर्च जासूद यांनी केला. 2018 पासूम डिसेंबर 2025 पर्यत वेळोवेळी फसवणूक करून 4 ते 5 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचं तक्रारीत नमूद करण्यात आलं आहे. अवतार पूजेसाठी अधिक पैसे उकळण्यासाठी सुरवातीला टाळाटाळ करणाऱ्या भोंदू बाबाने 1 ऑक्टोबर 2018 ला रात्री 8 वाजता पूजेसाठी बोलावले. इशान्येश्वर मंदिराच्या मागील बाजूस अंधारात नेऊन इशानेश्वर महादेव नागाच्या रुपात दर्शन देतील, असे भासवून खोटा नाग दाखवून भीती दाखवून फसवणूक केल्याचा आरोप आहे.
फार्म हाऊसच्या बांधकामसाठी 1 कोटी 11 लाख रुपये उकळले- (Ashok Kharat Case Nashik Crime News)
नागदेवताने दर्शन दिले आता पुढील 5 वर्षात 21 देशात जाऊन तिथला मातीला स्पर्श केल्यानंतरच लॉजेस्टिकचा व्यवसाय सुरू करायला सांगितले. मला 21 देशात नेले नाही तर नागदेवताचा कोप होईल, नागाचा दंश होऊन मृत्युची भीती दाखवली. मिरगाव येथील फार्म हाऊसच्या बांधकामसाठी 1 कोटी 11 लाख रुपये उकळले. नवीन वास्तूमध्ये तुर्कस्थानचे लाकूड व लोखंडाचे फर्निचर बसविण्यासाठी 49 लाख रुपयांची मागणी केली. इतर सागवानी फर्निचर बनविण्यासाठी 29 लाख रुपये, फार्म हाऊसमध्ये किचन बनविण्यासाठी 42 लाख 50 हजार रुपये उकळले. जासूद यांना भीती घालून भोंदू अशोक खरात याने पूजा विधीच्या नावाखाली युगांडा, इजिप्त, आयर्लंड, श्रीलंका, कंबोडिया, बांगलादेश या देशांना भेट दिली. त्याआधी म्यानमार, ग्रीनलँडचा दौरा केला. ग्रीनलँडच्या हॉटेलमध्ये असताना कैलास मानसरोवरला स्वर्गाचे पहिले टोक आणि ग्रीनलँडला स्वर्गचे दुसरे टोक मानतात असे सांगून फरशीवर झोपून स्वर्गात जाण्याचा ड्रामा केला. आपली फसवणूक होते आहे हे लक्षात आल्यानंतर जासूद यांनी अशोक खरात कडे खर्च केलेलं पैसे मागितले असता त्याने सिन्नरच्या वावी पोलिसात खंडणीचा गुन्हा दाखल केल्याच फिर्याद देण्यात आली आहे. (Ashok Kharat Case Nashik Crime News)
सबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.