मंदिराच्या मागे नेलं; जमिनीवर रिंगण आखून त्यामध्ये उभं केलं; बाहेर पडण्याचा प्रयत्न केला तर भस्

नाशिक : नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचे (Ashok Kharat) तपासात अनेक कारनामे समोर येत आहेत, अशातच आणखी एक फसवणुकीचा गुन्हा खरातवरती दाखल करण्यात आला आहे. नाशिक जिल्ह्यातील सिन्नरमधील मिरगावामध्ये भोंदू अशोक खरात याने उभारलेल्या आलीशान फार्महाउसमध्ये लावण्यासाठी फर्निचर थेट तुर्कस्थानातून मागवून घेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. यासाठी पुण्याचे बांधकाम व्यावसायिक फिर्यादी राजेंद्र जासूद यांना तब्बल ९० लाख रूपये खर्च करण्यास अशोक खरातने भाग पाडल्याचे त्यांनी फिर्यादीत म्हटले आहे. फार्महाउस बांधकामासह इंटेरिअर आणि फर्निचरसाठी तब्बल अडीच कोटी रूपये भोंदू खरातने त्यांच्याकडून उकळले होते. त्यांनी या प्रकरणी आता गुन्हा दाखल केला आहे.

बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तू जळून भस्म होईल

मिळालेल्या माहितीनुसार, परदेशात लॉजिस्टिकचा व्यवसाय सुरु करायचा म्हणून आशिर्वाद घेण्यासाठी जासूद खरात बाबाकडे गेले होते. जून २०२२ साली जासूद यांना भोंदू खरातने सिन्नरच्या मिरगावातील ईशान्येश्वर महादेव मंदिरात बोलावून घेतले. भोंदूबाबाने बांधलेल्या नव्या वास्तूमध्ये उत्तरपुजा करावी लागेल असे सांगून माझ्या नव्या वास्तूमध्ये तुर्कस्थानचे लाकडी व लोखंडी फर्निचर बसवावे लागेल, तरच उत्तरपुजा करताना नकारात्मक उर्जा त्या फर्निचरमध्ये समावून नष्ट होईल, असे भोंदू खरातने सांगितले. तसे न केल्यास
तुझा मृत्यू अटळ असल्याची पुन्हा भीती दाखविली आणि मंदिराच्या पाठीमागे घेऊन जात जमिनीवर रिंगण आखून त्यामध्ये जासूद यांना उभे केले आणि यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केल्यास तू जळून भस्म होईल, असे सांगून फर्निचर बुकिंग करण्यासाठी दबाव वाढवला.

जासूद यांनी जीवाच्या भीतीने घाबरून ओळखीचे असलेले फर्निचर व्यवसायातील एजंट यांच्याशी संपर्क साधला. त्यांच्यामार्फत बुकिंग केली. २०२२-२०२३ सालापर्यंत फार्महाऊससाठी तुर्कस्थानातून तब्बल ९० लाखांचे फर्निचर विकत घेऊन भोंदू खरातला दिले. त्यानंतर सागवानी लाकडामध्ये फर्निचर बनवून देण्यासाठी पुण्याच्या टिंबर मार्केटमधून २९ लाखांचे सागवानी लाकूड बळजबरीने खरेदी करण्यास भाग पाडल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

स्वयंपाकघराची सजावट करण्यासाठी ४२ लाख ५०

भोंदू खरात याने बांधलेल्या फार्महाउसमधील फक्त स्वयंपाकघराची सजावट ४२ लाख ५० हजाराची आहे. तेथे बसविण्यात आलेल्या विविध इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, साधनसामुग्रीसुद्धा भोंदू खरात याने जासूद यांच्यामार्फत खरेदी करून घेतली असल्याची माहिती समोर आली आहे.

अवतारपुजेच्या नावाखाली परदेशवारी आणि अमेरिकेमध्ये वैद्यकिय उपचाराची गरज पूर्ण करून घेतल्यानंतर खरात याने जासूद यांच्यापुढे ‘उत्तरपुजा’ करण्यासाठी सांगितले. २०१९ ते २०२२ सालापर्यंत उत्तरपुजा करण्याकरिता त्यांच्या नव्या वास्तूची उभारणी झाली पाहिजे असे सांगून जासूद यांच्याकडून मिरगाव येथील फार्महाउसच्या बांधकामासाठी तब्बल १ कोटी ११ लाख रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे.

आणखी वाचा

Comments are closed.