मोठी बातमी: मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर अशोक खरातला पाण्याची जोडणी, शिंदेसेनेचा गंभीर आरोप
Sheetal Mhatre On Ashok Kharat Case: नाशिकमधील भोंदूबाबा अशोक खरातचं (Ashok Kharat) प्रकरण सध्या देशासह राज्यभरत चांगलचं गाजत आहे. नाशिकमधील विकृत भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावरुन सध्या राजकीय वर्तुळात अनेकांचे धाबे दणाणले आहेत. अशोक खरात (Ashok Kharat) हा राज्यातील अनेक बड्या राजकीय नेत्यांचा अध्यात्मिक मार्गदर्शक होता. याचदरम्यान, शिवसेना शिंदे गटाच्या प्रवक्त्या शीतल म्हात्रे (Sheetal Mhatre) यांनी एक्सवर केलेल्या ट्विटमुळे एकच खळबळ उडाली आहे.
क्रूरकर्मा खरातला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्रीच्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…यही तो नही ‘ताज’ का राज? उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे. ‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल, असं ट्विट शीतल म्हात्रेंनी केलं आहे. शीतल म्हात्रेंच्या या आरोपामुळे शिवसेना ठाकरे गट कोणती प्रतिक्रिया देणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. (Sheetal Mhatre On Ashok Kharat Case)
क्रूरकर्मा खरात ला दिली गेलेली पाण्याची जोडणी ही मातोश्री च्या मॅडमच्या आग्रहाखातर देण्यात आली होती म्हणे…
हे “ताज” चे रहस्य नाही का?उबाठाला हा प्रश्न विचारलाच पाहिजे…
‘ताज का राज’ फुटला तर यांच्या तोंडचं पाणी पळेल …#खरात_फाइल्स
— sheetal mhatre (@sheetalmhatre1) 25 मार्च 2026
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना नाशिकमधील दारणा धरणातून अशोक खरात यांच्या शिवनिका संस्थेसाठी 39 लाख लिटर पाणी मंजूर करण्यात आले होते, ज्याचा जीआर (GR) नुकताच समोर आल्याने राजकीय वाद निर्माण झाला आहे. या संस्थानला पाणी पुरवण्यासाठी धरणापासून 48 किलोमीटर लांब पाईपलाईन टाकण्यात आली होती. हे पाणी पिण्यासाठी आरक्षित दाखवले असले तरी, त्याचा वापर खरातच्या 21 एकरमधील आंब्याच्या बागेसाठी केला जात असल्याचा आरोप आहे. हा प्रस्ताव 25 जून 2020 रोजी झालेल्या मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठकीत मंजूर झाला होता. त्यावेळी जयंत पाटील हे जलसंपदा मंत्री होते.
अशोक खरातला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी- (Ashok Kharat Case)
अंधश्रद्धेचा खुला बाजार मांडत अनेक महिलांचं लैंगिक शोषण करणाऱ्या स्वयंघोषित ज्योतिषी कॅप्टन अशोक खरात (Ashok Kharat) याला 29 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली. सध्या अशोक खरातची एसआयटीकडून चौकशी सुरु असून विविध धक्कादायक माहिती समोर येत आहे. याचदरम्यान आता अशोक खरातविरोधात 10 वा गुन्हा दाखल झाला आहे.
अशोक खरात प्रकरण नाशिक क्राईम न्यूज
अशोक खरातकडून जप्त बंदुकीचा परवाना नाशिक जिल्हा प्रशासनानेच दिल्याचे उघड झाले आहे. 15 ऑक्टोबर 2012 रोजी शस्त्र परवाना मंजूर झाला होता. 1 जानेवारी 2024 रोजी परवान्याचे नूतनीकरण झाल्याची नोंद आहे. चौकशीत अशोक खरातच्या फार्महाऊसवरून 21 काडतुसे जप्त करण्यात आली आहे. त्यापैकी 5 काडतुसे वापरलेली, वापर कशासाठी केला याचा तपास सुरू आहे. राज्यभर गाजत असलेल्या अशोक खरात प्रकरणात दररोज नवे खुलासे समोर येत आहे. गेल्या सात दिवसांच्या तपासात शस्त्र बाळगल्याची माहिती समोर आली आहे. काडतुसांचा वापर नेमका कुठे झाला?, तपास यंत्रणांचा शोध सुरू आहे. शस्त्र परवान्यासाठी खरातने जिल्हा प्रशासनाकडे अर्ज केला होता. जिल्हाधिकाऱ्यांच्या परवानगीनंतरच शस्त्र परवाना देण्यात आल्याची माहिती आहे. आता बंदुकीचा परवाना रद्द करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
संबंधित बातमी:
आणखी वाचा
Comments are closed.