मोठी बातमी : IPL 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जाहीर, 50 लढती, 12 शहरांत सामने खेळवणार!

आयपीएल 2026 वेळापत्रक : मुंबई: भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाकुडन (बीसीसीआय) यंदाच्या वर्षातील आयपीएलच्या (IPL) दुसऱ्या सत्रातील वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे. यापूर्वी बीसीसीआयने पहिल्या टप्प्यातील वेळापत्रक जारी केले असून दोनच दिवसांत आयपीएलचा धुरळा उडणार आहे. 28 मार्च रोजी आयपीएलचा पहिला सामना सनरायजर्स हैदराबाद आणि रॉयल चॅलेंज बंगळुरू यांच्यात बंगळुरुतील चेन्नास्वामी स्टेडियमवर रंगणार आहे. तर, स्पर्धेतील दुसऱ्या सत्रातील सामने 13 एप्रिल ते 24 मे 2026 या कालावधीत देशातील 12 ठिकाणी खेळविण्यात येणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात एकूण 50 सामने होणार आहेत. त्यामुळे, पुढील दोन महिने क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी पर्वणी आणि फुल टू मनोरंजन असणार आहे.

आयपीएलचा यंदाच्या हंगामाला दोन दिवसात म्हणजे 28 मार्चपासून सुरुवात होणार आहे. आयपीएलच्या पहिल्या सत्राचं वेळापत्रक आधीच जाहीर झालं होतं.  त्यानुसार 28 मार्च ते 12 एप्रिलपर्यंतचं 20 सामन्यांचं वेळापत्रक जाहीर केलं होतं. आता आयपीएल 2026 साठी दुसऱ्या सत्रातील वेळापत्रकही जाहीर झालं आहे.  त्यानुसार 13 एप्रिल ते 24 मे दरम्यान आयपीएलचे उर्वरित सामने होणार आहेत. मात्र सेमीफायनल, फायनलच्या लढती कधी होणार याबाबतचा उल्लेख या वेळापत्रकात नाही. पहिल्या आणि दुसऱ्या सत्रातील वेळापत्रकानुसार एकूण 70 सामने होणार आहेत. त्यानंतर  सेमीफायनल, फायनलच्या लढती होतील. हे सामने बंगळुरू, मुंबई, चेन्नई, कोलकाता, दिल्ली, अहमदाबाद, हैदराबाद, लखनौ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि नवं चंढीगड येथे आयोजित करण्यात आले आहेत.

दुसऱ्या सत्रात 50 सामने

दुसऱ्या सत्रातील वेळापत्रकानुसार 50 सामने खेळवण्यात येणार आहेत. या लढती 12 शहरांमध्ये होणार आहेत.  यामध्ये मुंबई, दिल्ली, बंगळुरु, चेन्नई, कोलकाता,अहमदाबाद, हैदराबाद, लखनऊ, जयपूर, धर्मशाला, रायपूर आणि न्यू चंदीगढ यांचा समावेश आहे. दुसऱ्या सत्रातील सामन्यांना 13 एप्रिलला हैदराबादमध्ये सनरयाजर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स यांच्या सामन्याने होईल. दुसऱ्या सत्रातील हायव्होल्टेज सामना म्हणून याकडे पाहिलं जात आहे

PL 2026 Schedule : पहिल्या 20 सामन्यांचं वेळापत्रक

1. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु  विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 28  मार्च, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
2. मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, 29 मार्च, मुंबई (सायं.7.30 वाजता)
3. राजस्थान रॉयल्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 30 मार्च, गुवाहाटी  (सायं.7.30 वाजता)
4. पंजाब किंग्ज विरुद्ध गुजरात टायटन्स, 31 मार्च, न्यू चंदीगड, (सायं.7.30 वाजता)
5. लखनौ सुपर जायंटस विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 1 एप्रिल, लखनौ (सायं.7.30 वाजता)
6. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद,2 एप्रिल,कोलकाता (सायं.7.30 वाजता)
7. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध पंजाब किंग्ज,3 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
8. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 4 एप्रिल, दिल्ली (दुपारी 3.30 वाजता)
9. गुजरात टायटन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, 4 एप्रिल, अहमदाबाद (सायं.7.30 वाजता)
10. सनरायजर्स हैदराबाद विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 5 एप्रिल, हैदराबाद, (दुपारी 3.30 वाजता)
11. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, 5 एप्रिल, बंगळुरु (सायं.7.30 वाजता)
12. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध पंजाब किंग्ज, 6 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
13. राजस्थान रॉयल्स विरुद्ध मुंबई इंडियन्स, 7 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
14. दिल्ली कॅपिटल्स विरुद्ध गुजरात टायटन्स, 8 एप्रिल, दिल्ली  (सायं.7.30 वाजता)
15. कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध लखनौ सुपर जायंटस, 9 एप्रिल, कोलकाता (सायं.7.30 वाजता)
16. राजस्थान रॉयल्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 10 एप्रिल, गुवाहाटी (सायं.7.30 वाजता)
17. पंजाब किंग्ज विरुद्ध सनरायजर्स हैदराबाद, 11 एप्रिल, न्यू चंदीगड (दुपारी 3.30 वाजता)
18. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, 11 एप्रिल, चेन्नई (सायं.7.30 वाजता)
19. लखनौ सुपर जायंटस विरुद्ध गुजरात टायटन्स, 12 एप्रिल, लखनौ (दुपारी 3.30 वाजता)
20. मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु, 12 एप्रिल, मुंबई (सायं.7.30 वाजता)

हेही वाचा

BCCI Schedule Update : रोहित शर्मा-विराट कोहली मैदानात कधी दिसणार? टीम इंडियाचे वर्षभराचे दौरे ठरले, BCCI कडून टाईमटेबल जारी

आणखी वाचा

Comments are closed.